टँकर विभागाचे संपर्क क्रमांक बंद; युवक काँग्रेसचा दावा | पुढारी

टँकर विभागाचे संपर्क क्रमांक बंद; युवक काँग्रेसचा दावा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील टँकर विभागातील दूरध्वनी आणि मोबाईल क्रमांक बंद आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने नवीन क्रमांक त्वरित नागरिकांसाठी जाहीर करावेत, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.
पर्वती, वडगाव, चतुःशृंगी, एसनडीटी, लष्कर, वारजे, नवीन होळकर या पाणीपुरवठा जलकेंद्रांच्या अखत्यारीत साधारण 6 टँकर विभाग येतात.

यात पर्वती, पद्मावती, रामटेकडी, धायरी, येरवडा या टँकर पॉइंटवरील दूरध्वनी आणि मोबाईल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले. पर्वती जलकेंद्रच्या ठिकाणी असणारे दूरध्वनी 02025501396 /02025506055, मोबाईल 9021393687 हे क्रमांक बंद आहेत, असा दावा युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ऋषीकेश बालगुडे यांनी केला आहे.

तेथील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी हे दूरध्वनी आणि मोबाईल अनेक महिने बंदच असतात, अशी माहिती दिली. महापालिकेच्या संकेतस्थळावरही या क्रमांकाची माहिती नाही. हे दूरध्वनी आणि मोबाईल क्रमांक सुरू करावेत, त्याची माहिती नागरिकांना द्यावी, अशी मागणी बालगुडे यांनी केली आहे.

हेही वाचा

कुरूप माशांच्या प्रजाती संकटात

किती चालणे ठरते उपयुक्त?

30 जून व 1,2 जुलैला होणार ‘पेरा’ची सीईटी

Back to top button