किती चालणे ठरते उपयुक्त? | पुढारी

किती चालणे ठरते उपयुक्त?

न्यूयॉर्क : ‘चालणे’ हा एक उत्तम व्यायाम असून त्यामुळे अनेक आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यास मदत मिळते, असे अनेक संशोधनातून निष्पन्न झाले आहे. सध्या लोक आपण किती अंतर चाललो, याची नोंद ठेवतात. बहुतेक लोक तर 10 हजार पावले चालावयाचे लक्ष्य निश्चित करतात. मात्र, विज्ञानाच्या द़ृष्टिकोनातून रोज किती चालावे म्हणजे आपल्या शरीरावर त्याचा सकारात्मक परीणाम होईल.

डीडब्ल्यूच्या अहवालानुसार, फिटनेस एक्स्पर्ट सांगतात की व्यक्तीने एक दिवसात 7500 पावले चालावित. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने दिवसाला किमान 6 कि.मी. चालणे गरजेचे आहे. असे जर न चुकता रोज केले तर माणूस आपल्या आयुष्यभरात अंदाजे दीड लाख कि.मी. इतके अंतर चालू शकतो. याबरोबरच असेही म्हटले जाते की, नियमितपणे प्रमाणापेक्षा जास्त चालल्यास ठराविक काळानंतर संबंधिताला टाच आणि गुडघेदुखीचा त्रास जाणवू शकतो.

यासाठीच रोज कमीत कमी साडेसात हजार पावले चालणे शरीराला उपयोगी ठरते. रोज दहा हजार पावले चालण्याची प्रथा कोठून आली? एका आकडेवारीनुसार जपानच्या एका कंपनीने पावले मोजण्याची मशिन तयार केली होती. ‘मानपो-केई’ असे नाव असलेली मशिन म्हणजेच 10 हजार पावले चालणे. यामुळेच रोज दहा हजार पावले चालण्याची प्रथा रूढ झाली. मात्र, इतके न चालता साडेसात हजार पावले चालले तरी शरीर आरोग्यदायी राहते. तसेच यामध्ये नियमितपणा असावा, असेही शास्त्रज्ञांचे मत आहे.

Back to top button