कुरूप माशांच्या प्रजाती संकटात | पुढारी

कुरूप माशांच्या प्रजाती संकटात

न्यूयॉर्क : जलवायू परिवर्तनासह अनेक कारणांमुळे अनेक जलचर प्रजाती लुप्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. या यादीत माशांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. माशासंबंधी करण्यात आलेल्या एका संशोधनातून आश्चर्यकारक माहिती उघड झाली आहे. माणूस नेहमीच सुंदर दिसणारे मासे पसंद करतो. भविष्यात अशा माशांच्या प्रजाती वाचविण्यासाठी माणूस प्रयत्न करेल.भलेही त्यांचा पर्यावरणाच्या द़ृष्टीने उपयोग नसला तरी. मात्र, ज्या सुंदर दिसत नाहीत अशा माशांच्या प्रजातींना सुरक्षेची जास्त गरज आहे. कारण दिसण्यास चांगले नसणार्‍या माशांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात लुप्त झाल्या आहेत.

फ्रान्सच्या माँटपेलियर युनिव्हर्सिटीच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनातील माहितीनुसार सुंदर माशांच्या तुलनेत दिसण्यास कुरूप असणार्‍या माशांच्या प्रजाती लुप्त होण्याचा धोका जास्त आहे. फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी या संशोधनात माशांची सुंदरता आणि कुरूपपणा याच्या आधारावर माशांची क्रमवारी तयार केली. यासाठी त्यांनी लर्निंग नामक मशिनचा उपयोग करत विश्लेषण केले. यामध्ये असे आढळून आले की, अत्यंत कमी दिसलेल्या अथवा सुंदर असलेल्या माशांच्या प्रजातीपेक्षा कमी सुंदर दिसणार्‍या माशांच्या प्रजाती जास्त धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले.

या संशोधनातील माहितीनुसार माणूस कमी सुंदर असणार्‍या माशांपेक्षा सुंदर असणार्‍या माशांच्या प्रजाती वाचवण्यात जास्त उत्सुक आहे. कारण माणसाला सुंदर मासेच फार आवडतात. मात्र, सुरक्षेची खरी गरज कुरूप माशांना आहे.

Back to top button