30 जून व 1,2 जुलैला होणार ‘पेरा’ची सीईटी | पुढारी

30 जून व 1,2 जुलैला होणार ‘पेरा’ची सीईटी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या विनंतीनुसार ‘पेरा’ (प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन), या महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या पेरा सीईटी सेलतर्फे 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी दुसर्‍यांदा सीईटीचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सीईटी 30 जून आणि 1 व 2 जुलै 2022 दरम्यान ऑनलाईन प्रॉक्टर्डद्वारे घेतली जाणार आहे.

या सीईटी परीक्षेसाठी 26 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या परीक्षेचा निकाल 9 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पेरा इंडियाचे अध्यक्ष व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, पेराचे उपाध्यक्ष भरत अग्रवाल आणि पेराचे सीईओ प्रा. हनुमंत पवार यांनी दिली.

भाजप शहराध्यक्ष बदलाबाबत चर्चा

सदस्य असलेली विद्यापीठे

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे, विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे, स्पायसर डव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी, पुणे, संदीप विद्यापीठ, नाशिक, संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर, एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद, एमआयटी डब्ल्यूपीयू युनिव्हर्सिटी, पुणे, डी. वाय. पाटील विद्यापीठ, अँबी पुणे, विजयभूमी युनिव्हर्सिटी, मुंबई, सोमय्या विद्यापीठ, मुंबई, डी.वाय. पाटील अग्रिकल्चर आणि टेक्निकल विद्यापीठ, कोल्हापूर आणि श्री बालाजी विद्यापीठ, पुणे ही विद्यापीठे पेरा संघटनेची सदस्य आहेत.

‘पेरा’ने देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंजिनिअरिंग, बायोइंजिनिअरिंग, डिझाइन, फाईन आर्ट्स, फूड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, लॉ आणि अ‍ॅग्री इंजिनिअरिंग या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेरा सीईटी महत्त्वाची आहे.

                प्रा. डॉ. मंगेश कराड, अध्यक्ष, पेरा इंडिया

हेही वाचा

Video : नाशिक-सातपूर औद्योगिक वसाहतीत मध्यरात्री बिबट्याचे दर्शन

भाजपने केला वारकर्‍यांचा अपमान : सुनील शेळके

लोणावळा :लोकअदालतीमध्ये 422 दाखलपूर्व प्रकरणे निकाली

Back to top button