Video : नाशिक-सातपूर औद्योगिक वसाहतीत मध्यरात्री बिबट्याचे दर्शन | पुढारी

Video : नाशिक-सातपूर औद्योगिक वसाहतीत मध्यरात्री बिबट्याचे दर्शन

नाशिक (सातपूर) पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर परिसरात बिबट्याचे दर्शन होत आहे. दोन दिवसांपूर्वी सिटी सेंटर मॉल परिसरात बिबट्याचा वावर कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. आता तोच बिबट्या सातपूर औद्योगिक वसाहतीत दिसून आला आहे. काल मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतील ओमीझ सोल्युशन निलकमल मार्बल कंपनीच्या मागील बाजूस बिबट्या निदर्शनास आला आहे.

कंपनीच्या सीसीटीव्ही नाईस एरिया परिसरातील कॅमेऱ्यातून तसे स्पष्ट होत आहे. बिबट्याच्या वावरामुळे कामगारांसह उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खासकरून मध्यरात्री शिफ्ट संपल्यानंतर शेकडो कामगार घराकडे परततात तर अनेक कामगार रात्रपाळीसाठी कंपनीत येत असतात. अशा स्थितीत बिबट्याचा वावर धोकादायक बनला आहे. याची दखल घेत वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे.बिबट्याचे दर्शन- पहा व्हिडिओ

हेही वाचा :

Back to top button