लोणावळा :लोकअदालतीमध्ये 422 दाखलपूर्व प्रकरणे निकाली | पुढारी

लोणावळा :लोकअदालतीमध्ये 422 दाखलपूर्व प्रकरणे निकाली

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, तालुका विधी सेवा समिती वडगाव मावळ व वडगाव मावळ बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा नगर परिषदेत आयोजित कायदेविषक शिबिर व मोबाईल व्हॅन लोकअदालतीमध्ये एकुण 422 दाखलपूर्व प्रकणे निकाली काढण्यात आली.

या वेळी 45 लाख 17 हजार 675 रुपये महसूल जमा झाला. या शिबिरात निवृत्त जिल्हा न्यायाधीश डी. डी. कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लोकअदालतीमध्ये एकुण 422 दाखलपूर्व प्रकणे सांमजस्याने निकाली निघाली काढण्यात आली. पॅनल जज्ज म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश डी. डी. कांबळे, वडगाव मावळ बार असोसिएशनच्या सचिव अ‍ॅड. सुधा शिंदे व अ‍ॅड. विशाल गाढवे यांनी काम पाहिले.

आयोजनामध्ये वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. मच्छिंद्र घोजगे, उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश पवार, अ‍ॅड. संजय वांद्रे, सचिव अ‍ॅड. हेमंत वाडेकर, अ‍ॅड. संजिव खळदकर यांसह अन्य पदाधिकार्‍यांनी यांनी सहभाग घेतला.

Back to top button