वारकर्‍यांच्या स्वागताला पुणे सज्ज | पुढारी

वारकर्‍यांच्या स्वागताला पुणे सज्ज

कसबा पेठ, पुढारी वृत्तसेवा: आषाढीवारीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी प्रशासन व पुणेकर सज्ज झाले आहेत. पालखीचा मुक्काम असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील नाना पेठेत महानगरपालिकेकडून मांडव टाकण्यात आला असून वारकर्‍यांच्या स्वागतासाठी कमानी, स्वागत फलक आणि रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात आहे. निवडुंगा विठ्ठल मंदिरात साफसफाईची कामे पूर्ण झाली असून शेवटचा हात मारण्याचे काम सुरू आहे.

मंदिर परिसरात तीन ते साडेतीन हजार वारकरी मुक्कामी असतात त्यांच्या राहण्यासाठी पार्किंगच्या जागेत व्यवस्था करण्यात आली आहे. वारकर्‍यांच्या सुरेक्षसाठी मंदिरात 16 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे वारकर्‍यांसाठी अन्नछात्रही उभारले असल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक आनंद पाध्ये यांनी सांगितले. भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिराच्या बाहेरील भिंतीना तसेच गाभार्‍यात रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच मंदिराची सजावट, मंडप व रोषणाईचे काम करण्यात येणार असल्याची माहिती पालिका कर्मचार्‍यांनी दिली.

परभणी : ‘रिलायन्स कंपनी गो बॅक’ चा नारा देत पीक विम्यासाठी भाजपचे आंदोलन

विविध मंडळांची लगबग सुरू

शहरात दाखल होणार्‍या पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांच्या स्वागतासाठी विविध मंडळे, मंदिरे, व्यक्तींनी जय्यत तयारी केली असून वारकर्‍यांच्या नाष्टा, जेवणाची, उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यासाठी लगबग सुरू असल्याचे कसबा पेठेतील पेशवे गणेश मंदिरात दिसून आले. याबाबत मंडळाचे खजिनदार गणेश नगरकर म्हणाले की,

ली 45 वर्षांपासून पेशवे गणेश मंदिरातर्फे पालखी व दिंडी तसेच वारकर्‍यांचे भव्य स्वागत करण्यात येते. यावेळी जवळपास 10 हजार वारकर्‍यांसाठी चहापान, बिस्कीट, मुक्कामी असणार्‍या 7 हजार वारकर्‍यांसाठी जेवणाची व्यवस्था, आरोग्यतपासणी, शिबिरे, गरीब वारकर्‍यांना कपडे, टॉवेल वाटप मंदिरातर्फे करण्यात येणार आहे.

हेही वाचा

देशात पेट्रोल-डिझेलचे मुबलक उत्पादन! इंधन मागणीच्या वाढीनंतर पेट्रोलियम मंत्रालयाची स्पष्टोक्ती

नगर : राजगिर्‍याचे लाडू शाळेत पोहचलेच नाही..!

नाशिकच्या सिटी सेंटर मॉल परिसरात बिबट्याचे दर्शन, एका वाहनचालकाने केले चित्रीकरण

Back to top button