नाशिकच्या सिटी सेंटर मॉल परिसरात बिबट्याचे दर्शन, एका वाहनचालकाने केले चित्रीकरण | पुढारी

नाशिकच्या सिटी सेंटर मॉल परिसरात बिबट्याचे दर्शन, एका वाहनचालकाने केले चित्रीकरण

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उंटवाडी सिटी सेंटर मॉल परिसरात बुधवारी (दि.१५) सकाळी बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. 

सिटी सेंटर मॉल ते ठक्कर डोम या रस्त्यालगत बिबट्या जात असताना एका चारचाकी वाहनचालकाने चित्रीकरण केले. तो व्हिडिओ सर्वत्र फिरत आहे. यात बिबट्याने सिटी सेंटर मॉल रस्त्याने पुढे जात ठक्कर डोम परिसरातील भिंतीवरून उडी मारून पसार झाल्याचे दिसते. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी विवेक भदाणे, उत्तम पाटील, अनिल अहिरराव, जगताप यांनी सकाळी ७ ते सकाळी १० पर्यंत तसेच दुपारी २ ते ४ या वेळेत परिसर पिंजून काढला. परंतु बिबट्या आढळला नाही. पलीकडे शेती असल्याने बिबट्या त्या भागाकडे गेला असेल, असे सांगत नागरिकांनी घाबरू नये, सतर्क राहावे, असे आवाहन वन अधिकारी विवेक भदाणे यांनी केले. 

हेही वाचा :

Back to top button