पोलिसांविरुद्ध याचिका दाखल करू: अ‍ॅड. सरोदे | पुढारी

पोलिसांविरुद्ध याचिका दाखल करू: अ‍ॅड. सरोदे

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आई-वडिलांनी घरात भटक्या कुत्र्यांसोबत मुलाला ठेवल्याने त्याची वर्तणूक कुत्र्याप्रमाणे झाली, अशी अतिरंजित माहिती पसरवून सनसनाटी निर्माण केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करू अशी माहिती अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली. पोटच्या मुलाला 2 वर्षे कुर्त्यांसोबत कोंडून ठेवल्याप्रकरणी पुणे नगरपालिकेने एका घरावर कारवाई केली होती.

या वेळी 15 जिवंत कुत्र्यांची सुटका करीत मुलाला 22 कुर्त्यांसोबत डांबणार्‍या आई-वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात
जामीन मिळण्यासाठी त्यांनी अ‍ॅड. सरोदे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. या वेळी मुलगा, कुत्रे, आई-वडील सगळ्यांवर अन्याय करून त्यांचे गुन्हेगारीकरण करणारे हे प्रकरण आहे. कुत्रा चार पायांवर चालतो व जिभेने अन्न-पाणी ग्रहण करतो, यांपैकी हा मुलगा करीत नाही. त्यासंबंधी काही पुरावे प्रथमदर्शनी सादर केलेले नाहीत.

पुणे : दिवे घाटाने घेतला मोकळा श्वास

मग हा मुलगा कुर्त्यांसारखा वागतो, अशा बातम्या पसरवून नेहमीसाठी या मुलाच्या चारित्र्याची व मानवी अस्तित्वाची बदनामी घडवून आणण्यासाठी पोलिस यंत्रणेचा वापर कुणी केला, याचा शोध घेतला पाहिजे. पोलिसांना हाताशी धरून प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणार्‍या एका संघटनेने ही खोटी केस दाखल केली.

भारतीय दंड विधान कलम 308 नुसार मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पाळीव कुत्रे व मुलगा यांना घरी एकत्र ठेवले म्हणून आई-वडिलांवर नोंदविण्यात आला, असा आरोपही अ‍ॅड. सरोदे यांनी केला. मुलाचा जबाब बाल-मानसोपचारतज्ज्ञाने न नोंदविणे ही कायदेशीर अनियमितता असल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने आई-वडिलांना प्रत्येकी 15 हजार रुपये व एक जामीनदार द्यावा, या अटींवर जामीन मंजूर केला.

हेही वाचा 

नबाब मलिकांच्या अडचणीत वाढ, मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका

पिंपरी: पार्किंगमध्ये खेळणार्‍या चिमुरडीवर अत्याचार

‘ईडी’विरोधात काँग्रेस रस्त्यावर; राहुल गांधींच्या अटकेसाठी ‘ईडी’ची कारवाई होत असल्याचा आरोप

Back to top button