पुणे : दिवे घाटाने घेतला मोकळा श्वास | पुढारी

पुणे : दिवे घाटाने घेतला मोकळा श्वास

दिवे : पुढारी वृत्तसेवा : गेली दोन वर्षे कोरोनामुळे वारी सोहळा मोजक्याच मानकर्‍यांच्या उपस्थितीत झाला. मात्र यंदा पुन्हा पूर्ववत वारी निघणार असल्याने पुणे महापालिका व वडकी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घाटातील कचरा साफ केेला जात आहे. परिणामी दिवे घाटाने मोकळा श्वास घेतला आहे.

ऐकावं ते नवलच! चक्क उंदरांनी १० तोळे सोने पळवले, पोलिसांनी गटारातून केले जप्त

माउलींच्या पालखीचा पुणे येथील मुक्काम संपल्यावर पालखी सोपानकाकांच्या नगरीकडे सासवड मुक्कामी येत असते. दिवे घाट हा यात महत्त्वाचा टप्पा असतो. पुणे ते सासवडपर्यंत असंख्य पुणेकर सहभागी होत असतात. दोन वर्षांच्या खंडानंतर पालखी सोहळा
होत असल्याने यावर्षी यात वाढ होण्याची शक्यता आहे. वारकर्‍यांच्या गर्दीची संख्या गृहीत धरून प्रशासन सज्ज झाले आहे. दिवे घाटात गटारात ढासळलेल्या दरडीचा राडारोडा पडून होता. रात्रीच्या वेळी अज्ञात वाहनातूनही दिवे घाटात कचरा टाकला जातो. घाटात सर्वत्र त्याची दुर्गंधी पसरली होती. दैनिक पुढारीच्या माध्यमातून याबाबत वारंवार आवाज उठविला होता. मात्र गेले दोन दिवसांपासून प्रशासन सज्ज झाले आहे.

दाऊदची धमकी देत ७५ वर्षीय व्यावसायिकाचा ३५ वर्षीय लेखिकेवर बलात्कार

पंचवीस टन कचरा गोळा

पुणे महानगरपालिका व वडकी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घाटातील कचरा गोळा करण्याचे काम सुरू आहे. यात आतापर्यंत तब्बल पंचवीस टन कचरा गोळा केल्याची माहिती दिलीप शेवाळे यांनी दिली. वारीच्या पार्श्वभूमीवर दिवे घाटाने मोकळा श्वास घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Back to top button