शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी घेतला विद्यार्थ्यांचा तास | पुढारी

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी घेतला विद्यार्थ्यांचा तास

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आपण नेहमी शाळेमध्ये शिक्षकांना शिकवताना पाहिले असेल, मात्र, बुधवारी शाळेच्या पहिल्या दिवशी राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी भवानी पेठेतील महापालिकेच्या आचार्य विनोबा भावे शाळेत हजेरी लावत विद्यार्थ्यांचा पहिला तास घेतला आणि त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.

विद्यार्थ्यांनीही यावेळी हसत-खेळत आयुक्तांशी संवाद साधला.बुधवारपासून शहरातील शाळा सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्तांनी आचार्य विनोबा भावे शाळेत भेट दिली. आयुक्तांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरच दिव्यांग विद्यार्थी अन्सार शेख या विद्यार्थ्याला गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले.

यावेळी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी राऊत, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर व इतर शिक्षण अधिकारी आदी उपस्थित होते. त्यानंतर आयुक्तांनी नियोजित कार्यक्रम ठेवलेल्या हॉलमध्ये न जाता थेट इयत्ता नववीच्या वर्गात प्रवेश केला. यावेळी त्यांनी शिक्षकांची चांगलीच शाळा घेतली. विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवायचे, याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा

पिंपरी : आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील दुसरा टप्पा सुरू

शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे हर्षोल्हासात स्वागत; शाळा पुन्हा गजबजल्या

पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीचा यांना घेतला शोध?

Back to top button