शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे हर्षोल्हासात स्वागत; शाळा पुन्हा गजबजल्या | पुढारी

शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे हर्षोल्हासात स्वागत; शाळा पुन्हा गजबजल्या

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गेली दोन वर्षे घरात कोंडली गेलेली मुले बुधवारी (दि. 15) प्रत्यक्ष शाळेत आली. शिक्षकांना प्रत्यक्ष पाहून लहानग्यांनी हर्षोल्हास केला, तर शाळांनीही मुलांचे जंगी स्वागत केले. पहिली-दुसरीच्या मुलांनी प्रत्यक्षात पहिल्यांदाच शिक्षकांना पाहिले. पहिलीत नव्याने आलेली काही मुले रडत होती, तर काहींच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. तब्बल दोन वर्षांनंतर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात शाळांमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले.

सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलमध्ये विद्यार्थी येण्यापूर्वीच त्यांच्या स्वागतासाठी मुख्याध्यापिका सपकाळ, सर्व शिक्षकवर्ग, इतर कर्मचारीवर्ग शाळेच्या प्रांगणात हजर होते. स्वागतपर गीतांमध्ये विद्यार्थ्यांचे आगमन झाले. भवानी पेठेतील बापूसाहेब पवार प्राथमिक शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला. शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वसंतदादा पाटील हायस्कूल मनपा शाळा क्रमांक 1 मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल येथे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि कॅडबरी देऊन माजी उपमहापौर आबा बागूल आणि शिक्षकांनी स्वागत केले. या वेळी रॅम्बो सर्कशीचे तीन विदूषकही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खास उपस्थित होते. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना हसवून स्वागत केले. शि. प्र. मंडळीच्या लोकमान्यनगर येथील एसपीएम इंग्लिश स्कूलच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

पॅराग्लायडिंग करताना पक्षी बसला पायावर!

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या वेशातील कलाकाराने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना लाडू भरवून आणि औक्षण करून मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांनी ज्ञानमंदिरात प्रवेश केला. मंगलमय आणि आनंदी वातावरणात मुलांचे औक्षण करून म. ए. सो. बालशिक्षण मंदिर शाळा, डेक्कन जिमखाना येथील शिक्षिकांनी चिमुकल्यांचा शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय केला.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल व आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स ,एमसीईएस इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे गुलाबाचे फूल व चॉकलेट देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) विविध शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व शाळांमध्ये फुलांच्या माळा, तोरणे, फुगे, रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या अशी सजावट करण्यात आली होती. मिकी माऊस, डोरेमॉन, छोटा भीम, फ्रेंड गणेशा असे विद्यार्थ्यांना आवडणारे कार्टून्स स्वागतासाठी सज्ज होते. सनई, चौघडा व तुतारींचे स्वर आणि बालगीते उत्साहात भर घालत होती. रानडे बालक मंदिरात ’स्वच्छतेच्या सवयी’चे प्रबोधन करणारे कटआऊट्स लावण्यात आले होते.

अबब…! एका पाण्याच्या बाटलीची किंमत 65 लाख

नवीन मराठी शाळेत सेवा-सहयोग संस्थेच्या सहकार्याने चारशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मा. स. गोळवलकर गुरुजी शाळेत योग सप्ताह सुरू करण्यात आला. डीईएस, पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत रंगीबेरंगी फुग्यांची सजावट करण्यात आली होती. स्वागतास उभे असलेले आवडते कार्टून्स पाहून विद्यार्थ्यांना आनंद झाला. विद्यार्थ्यांसाठी पपेट शोचे आयोजन करण्यात आले होते. वर्गामध्ये गप्पा-गोष्टी आणि गाणी झाली.

न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (एनईएमएस) शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण जतन करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता. अहिल्यादेवी प्रशालेत दहावीच्या विद्यार्थिनींनी पुष्पवृष्टी आणि औक्षण करून पाचवीच्या विद्यार्थिनींचे स्वागत केले. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी

हेही वाचा

पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मेंदू असतो अधिक गरम!

प्रतिकारकशक्‍ती तपासण्यासाठी नवे किट

‘अंबाबाई’चा लाडू प्रसाद टेंडरच्या लालफितीत

Back to top button