वाहन परवाना चाचणी 22 जूनला बंद | पुढारी

वाहन परवाना चाचणी 22 जूनला बंद

पुणे, पुढारी वृत्तसेवा: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे 22 जून रोजी पुण्यात आगमन होणार आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असल्यामुळे 22 जून रोजी वाहनचालक परवाना चाचणी होणार नसून, ती 25 जूनला घेतली जाणार आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडून आळंदी रस्ता कार्यालय येथे मोटारसायकलची (विथ गिअर, विदाऊट गिअर,) चाचणी परीक्षा ऑटोरिक्षा पुनर्चाचणी परीक्षा, आयडीटीआर भोसरी येथे मोटार कार यांची चाचणी परीक्षा घेतली जाते. 22 जून रोजी पालख्या पुण्यात येत असल्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.

त्यामुळे 22 जून रोजी वाहन चालविण्याच्या ‘परमनंट’ परवान्याची चाचणी पुढे ढकण्यात आली आहे. ती चाचणी 25 जून रोजी घेतली जाणार आहे. ज्या अर्जदारांनी 22 जूनची पूर्वनियोजित वेळ घेतली आहे अशा अर्जदारांनी शिकाऊ चाचणी अर्ज, शिकाऊ वाहन परवाना चाचणी आणि पक्का वाहन परवाना चाचणी परीक्षेसाठी 25 जून रोजी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा 

पाटण : कोयना धरणाला आता पावसाची प्रतीक्षा

अनुदान प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता 30 जून पर्यंत; शाळांसाठी शिक्षण विभागाची शेवटची संधी

‘एसएमएस, फसवे कॉल यापासून सावध राहा’

Back to top button