‘एसएमएस, फसवे कॉल यापासून सावध राहा’ | पुढारी

‘एसएमएस, फसवे कॉल यापासून सावध राहा’

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ‘भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे, फसवे कॉल तसेच मेसेज येत असल्याच्या असंख्य तक्रारी आल्या आहेत. बनावट कॉल्स आणि मेसेजपासून सावध राहावे,’ असे आवाहन पीएफ कार्यालयातर्फे सदस्यांना करण्यात आले आहे. क्लेम सेटलमेंट, अ‍ॅडव्हान्स, पेन्शन यांसारख्या सेवा पीएफ कार्यालयामार्फत देण्यात येतात.

मात्र, ग्राहकांना फसवे कॉल्स आणि मेसेज पाठवून बँक खात्यात पैसे जमा करावेत, असे वेबसाईट, टेलिकॉल, एसएमएस, ई-मेल, सोशल मीडियाव्दारे सांगण्यात येत असल्याचे पीएफ कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. फसव्या कॉल्स आणि मेसेजद्वारे बँक खात्यात पैसे जमा करण्याबाबत सांगण्यात येते.

मात्र, पीएफ कार्यालयाने कोणतीही माहिती मागविलेली नाही, असे पीएफ कार्यालयाने म्हटले आहे. त्यामुळे पीएफच्या सदस्यांनी सावध राहावे. अधिक माहितीसाठी डब्लूडब्लूडब्लू डॉट ईपीएफइंडिया डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वर संपर्क साधावा, असेही आवाहन पीएफ कार्यालयाने केले आहे.

हेही वाचा

अधिकार्‍यांचा ‘अर्थ’पूर्ण वादाचा विद्यार्थ्यांना अडथळा

‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असावे: ठाकरे

..मग ऑडिट कधी होणार: राजू शेट्टींची शरद पवारांवर नाव न घेता टीका

Back to top button