..मग ऑडिट कधी होणार: राजू शेट्टींची शरद पवारांवर नाव न घेता टीका | पुढारी

..मग ऑडिट कधी होणार: राजू शेट्टींची शरद पवारांवर नाव न घेता टीका

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) साखर उतारा तपासणीच्या पध्दतीवर आमचे काही आक्षेप आहेत. व्हीएसआयचे अध्यक्ष आजोबा आणि नातू कारखान्याचा चेअरमन असल्यावर हे काम कधी होणार,’ असा प्रश्न उपस्थित करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची त्यांनी ऊस गाळप हंगाम 2021-22 च्या संदर्भात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते साखर संकुल येथे बोलत होते.इ15 जून उजाडूनही उर्वरित एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना मिळाली नसल्याने शेट्टी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘इथेनॉलमुळे कमी होणार्‍या साखर उतार्‍यातील घट तपासून उसाचा अंतिम उतारा प्रमाणित करण्याबाबत व्हीएसआयचा वेळकाढूपणा चालला आहे.

व्हीएसआयकडून ऑडिट करून शेतकर्‍यांची त्या वर्षाची उसाची रिकव्हरी निश्चित करून गळीत हंगामातील एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम संपून जवळपास दीड महिना झाला, तरी या दोन जिल्ह्यांतील 46 पैकी फक्त 12 साखर कारखान्यांचे ऑडिट झाले आहे. त्यामुळे हे ऑडिट होईल की नाही, असा प्रश्न आहे.’

जेऊरमध्ये पाच दुकाने फोडून लाखोंचा ऐवज लंपास

इथेनॉलमुळे उतार्‍यात होणारी घट निश्चित करून सुधारित अंतिम उतारा वेळेत जाहीर होत नसल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे उशिराने दिलेल्या एफआरपी रकमेवर 15 टक्के व्याज द्यायला हवे. उसाच्या रसापासून इथेनॉल, बी-हेवीपासून इथेनॉलमुळे कमी होणार्‍या एफआरपीच्या रकमेवर केंद्र सरकारने नव्याने उपाययोजना कराव्यात, अशी आमची मागणी आहे, असे त्यांनी सांगितले. ऊस नियंत्रण अध्यादेशात महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीर दुरुस्ती करून दोन टप्प्यांत एफआरपी देण्याबाबत परिपत्रक काढले आहे.

त्यास आम्ही उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तरीसुध्दा येणार्‍या ऊस गाळप हंगामात उसाची एकरकमीच एफआरपी आम्ही घेऊ; अन्यथा कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. राज्यातील ऊस शिल्लक राहिला नसून सर्व साखर कारखाने बंद झाल्याचा दावा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला आहे. मात्र, ऊस शिल्लक राहिल्याचे स्पष्ट झाल्यास साखर संकुलच्या दारात आणून तो पेटवू, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला.

हेही वाचा

खते, कीटकनाशके 63 विक्रीपरवाने निलंबित

नोकरभरतीचा मार्ग मोकळा; भरती प्रक्रियेसाठी सात बँकिंग संस्थांचा पॅनेलमध्ये समावेश

आयपीएल संघ खेळतील विदेशात सामने

Back to top button