पुणे : पथारी संघटनेच्या अध्यक्षावर गोळीबार करणार्‍या दोघांना बेड्या | पुढारी

पुणे : पथारी संघटनेच्या अध्यक्षावर गोळीबार करणार्‍या दोघांना बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एम. जी. रोड पथारी असोसिएशनच्या अध्यक्षावर पूर्व वैमनस्यातून छर्‍याच्या बंदुकीतून गोळीबार करत त्याच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍या दोघांना लष्कर पोलिसांनी आठ तासांच्या बेड्या ठोकल्या. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 18 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरु; २४ तासांत ८,८२२ नवे रुग्ण, १५ मृत्यू

नयीम उर्फ शानू सलीम शेख (38, रा. भिमपुरा, कॅम्प) आणि तरबेज अब्दुल रशिद कुरेशी (46, रा. कुरेशी मस्जिद जवळ) अशी अटक करण्यात आलेल्यांचीनावे आहेत. गुन्ह्यातील मुख्य आरोपी जुल्फीकार शेख याचा पोलिस शोध घेत आहेत. या हल्ल्यात तौफिक अख्तर शेख (45, रा. भीमपुरा कॅम्प, पुणे) हे जखमी झाले असून, त्यांना एक छर्रा लागला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Suicide : नाशिकमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारीकेची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तौफिक शेख हे एम. जी. रोड पथारी असोसिएनचे अध्यक्ष आहेत. त्यांचे आणि संशयीत आरोपी जुल्फीकार शेख यांच्याबरोबर वाद होते. याच वादातून जुल्फीकार आणि अटक केलेल्या दोन साथीदारांनी तौफिक यांना धमकावत त्यांच्यावर मंगळवारी रात्री ते फॅशनस्ट्रिट परिसरातील एबीसी फार्म नावाच्या दुकानाजवळ आले असता त्यांच्यावर छर्र्‍याच्या बंदुकीतून गोळीबार केला. या गोळीबारात एक छर्रा तौफिक यांना लागला. त्यांच्यावर खुनी हल्ला केल्यानंतर तिघेही फरार झाले होते. त्यातील दोघांना आता लष्कर पोलिसांनी अटक केली.

कोल्‍हापूर : डॉ. जनार्दन वाघमारे यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

संशयीत आरोपींचे आणि फिर्यादीचे पूर्वीपासूनचे वाद होते. फॅशनस्ट्रिटमधील दुकानाच्या बाबतीत त्यांच्यात वाद होते. याच वादातून तिघांनी हा खुनी हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

                               – अशोक कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस ठाणे.

Back to top button