पुणे : भोर तालुक्यात सव्वातीन लाख जणांचे लसीकरण | पुढारी

पुणे : भोर तालुक्यात सव्वातीन लाख जणांचे लसीकरण

भोर : पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यात आरोग्य विभागाने 3 लाख 24 हजार 567 नागरिकांचे कोविड लसीकरण केले आहे. 7 हजार नागरिकांचे दुसर्‍या डोसचे लसीकरण लवकरच पूर्ण करणार आहे. चौथ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सुर्यकांत कर्‍हाळे यांनी दिली.

COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरु; २४ तासांत ८,८२२ नवे रुग्ण, १५ मृत्यू

तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे, भोर उपजिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरणाचे तिन्ही डोसचे सेंटर सुरू आहे. तालुक्यात पहिला डोस (169900), दुसरा (150857), तर तिसरा डोस 3810 जणांनी असे एकूण 3 लाख 24 हजार 567 जणांचे लसीकरण झाले आहे. मोठ्या संख्येने केंद्रे असल्याने एवढे लसीकरण झाले आहे.

Suicide : नाशिकमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारीकेची आत्महत्या

हिल्या डोसनंतर तीन महिन्याने दुसरा, तर 9 महिन्यांनंतर तिसरा डोस देत आहेत. तिसरा डोस हा 60 वर्षावरील नागरिकांना शासकीय रुग्णालयात उपलब्ध होत असून त्या आतील रुग्णांना खासगीमध्ये पैसे देऊन घ्यावा लागत आहे. तालुक्यात एकच कोविड रुग्ण असून गरज भासल्यास दुसरे कोविड सेंटर सुरू करणार आहे. गाव पातळीवर आशा सेविकांचीही यंत्रणा सज्ज झाल्याचे कर्‍हाळे यांनी सांगितले.

कोल्‍हापूर : डॉ. जनार्दन वाघमारे यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

…अशी काळजी घ्या

नागरिकांनी पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून घ्यावे. गर्दीच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर, रुमाल यांचा वापर करावा. खोकला, सर्दी, अंगदुखी अंगावर न काढता लगेच दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कर्‍हाळे यांनी केले आहे.

Back to top button