बारामती तालुका अद्याप कोरोनामुक्त | पुढारी

बारामती तालुका अद्याप कोरोनामुक्त

बारामती : पुढारी वृत्तसेवा : राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली, तरी बारामती शहर आणि तालुक्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसल्याने बारामती सध्यातरी कोरोनामुक्त आहे.

मविआ-भाजपमध्ये सामना, विधान परिषदेचीही लढत चुरशीची; १० जागांसाठी ११ उमेदवार

शहरासह ग्रामीण भागात रुग्णांची तपासणी सुरू असून, खासगी रुग्णालयांनाही सर्दी, खोकला व तापाच्या तपासणी करून लवकरात निदान करण्याच्या सूचना दिल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. ज्या नागरिकांचा दुसरा डोस राहिला असेल, त्यांनी तो तातडीने घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तालुक्यात मुबलक प्रमाणात लस असून, राहिलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बेराेजगारांसाठी खूशखबर : पुढील दीड वर्षांमध्‍ये १० लाख जणांना नाेकरी मिळणार ! पंतप्रधान मोदींनी दिले भरतीचे आदेश

तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच मेडिकल कॉलेज येथे लसीकरण सुरू आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेसाठी यंत्रणा सज्ज असून, आरोग्य केंद्रात अँटिजन टेस्ट किट देण्यात आली आहे. रुई येथील मॉड्युलर रुग्णालयही कोरोनासाठी सज्ज करण्यात आले आहे. याशिवाय ’हर घर दस्तक’अंतर्गत आरोग्य कर्मचारी कोरोनाचा दुसरा डोस देत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज असून, चौथी लाट आलीच तर त्याला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे डॉ. खोमणे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे संबंध जिव्हाळ्याचे : संजय राऊत

नागरिकांनीही गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे. याशिवाय सॅनिटायझरचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन डॉ. खोमणे यांनी केले आहे.
सध्या तालुक्यातील शाळा-महाविद्यालये सुरू होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल, त्यांनी तो घ्यावा. पालकांनी विद्यार्थ्यांना डोस घेण्यासाठी सहकार्य करावे. कोरोनाची लाट येऊ नये, यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

                                                     – डॉ. मनोज खोमणे, तालुका वैद्यकीय अधिकारी

Back to top button