धनकवडी, पुढारी वृत्तसेवा: भारती विद्यापीठ भागातील त्रिमूर्ती चौक ते भारती विद्यापीठपर्यंतच्या परिसरात असलेल्या अनधिकृत फ्रंट मार्जिन व साईड मार्जीनमधील अतिक्रमणावर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय, बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, आकाशचिन्ह परवाना विभाग यांच्या संयुक्तरीत्या करण्यात आलेल्या कारवाईत भारती विहार सोसायटी, पतंग प्लाझा सोसायटी व पीआयसीटी कॉलेज रस्ता बाजूच्या समोरील 25 हजार स्क्वेअर फूट जागेवरील बांधकामे पाडण्यात आली.
त्यात पत्रा शेड बोर्ड व तात्पुरत्या 8 शेडवर व शॉपवर, पक्के बांधकाम यावर ही कारवाई झाली. या कारवाईत सहायक आयुक्त विजय वाघमोडे यांच्या समवेत बांधकाम नियंत्रण विभागचे कार्यकारी अभियंता चंद्रसेन नागटिळक यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता शैलेंद्र काथवटे, उमेश शिद्रुक, प्रशांत मोरे, कनिष्ठ अभियंता अक्षय देवकर, अतिक्रमण निरीक्षक संजय कुंंभार यांनी कारवाई केली.
या कारवाईत 80 मजूर कर्मचारी, 6 जेसीबी, 12 डम्पर, 2 गॅस कटर यांच्यासह 2 पोलिस निरीक्षक, 40 पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने तसेच वॉर्ड अतिक्रमण विभाग कर्मचारी, यांच्या मदतीने केली. या कारवाईसाठी नोटीस देऊनही अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे या भागामध्ये अनेक दुकानदारांनी तात्पुरते उभे केलेल्या शेडपत्रे, खुर्च्या-टेबल जप्त केले, दोन वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे, अशी माहिती शाखा अभियंता शैलेंद्र काथवटे यांनी दिली.
हेही वाचा