पिंपरी : बोलावण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मारहाण | पुढारी

पिंपरी : बोलावण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मारहाण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : फिर्यादी व त्यांचा मित्र घरी जात असताना आरोपीने आवाज दिला. मात्र फिर्यादीच्या मित्राने दुर्लक्ष केले म्हणून आरोपीने त्यास शिवीगाळ व मारहाण केले. तसेच फिर्यादीस हातातील लोखंडी खिळे मारून जखमी केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल राधेश्याम लखन (वय 21, रा. ओटास्किम, निगडी) व त्यांचा मित्र कुणाल अनिल वडागळे हे सोबत घरी जात असताना, आरोपी अक्षय गायकवाड (वय 22 रा. ओटास्किम निगडी) व दुसरा अनोळखी आरोपी यांनी कुणालला आवाज दिला.

मात्र त्याने दुर्लक्ष केले म्हणून आरोपीने त्यास शिवीगाळ व मारहाण केले. तसेच फिर्यादीस हातातील लोखंडी खिळे डोक्यात मारून जखमी केले. म्हणून फिर्यादीने निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

Back to top button