मिश्रपद्धतीच्या शिक्षणाची नव्या पिढीला गरज; डॉ. शां. ब. मुजुमदार यांचे प्रतिपादन | पुढारी

मिश्रपद्धतीच्या शिक्षणाची नव्या पिढीला गरज; डॉ. शां. ब. मुजुमदार यांचे प्रतिपादन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ’सध्याच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांना एकाच विषयात अभ्यास करताना त्यांना चाकोरीबाहेर जाऊन इतर विषयांतसुद्धा डोकावण्याची खरी गरज आहे. मिश्रपद्धतीचे शिक्षण देण्याची पुढील पिढीला आवश्यकता आहे,’ असे प्रतिपादन सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.

अभिनव कला महाविद्यालयातील कला शिक्षक प्रशिक्षण विभागाचे माजी विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. सुधाकर चव्हाण यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित गुरुवंदन सोहळ्यामध्ये ते बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी कला संचालक प्राध्यापक विश्वनाथ साबळे उपस्थित होते.

कलिंगडाची वाढ पाण्याअभावी खुंटली; शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान

डॉ. मुजुमदार म्हणाले की, एखाद्या देशाची प्रगती ही तेथील गुणवत्तापूर्ण शिक्षण असेल तरच संभवते, हे आपणाला वेळोवेळी जगातील विकसनशील देशांकडे पाहताना दिसते. नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना भविष्यात तू काय होणार, असा प्रश्न विचारल्यास ते इंजिनिअर, डॉक्टर, आर्किटेक्चर अशा विविध क्षेत्रांची नावे घेतात.

परंतु, मी भविष्यात शिक्षक होणार आहे, असे सांगणारे विद्यार्थी क्वचितच भेटतात. शिक्षण क्षेत्राविषयी असणारी ही उदासीनता पाहून कधीकधी खंत वाटते. प्रास्ताविक विजय दीक्षित यांनी केले. डॉ. मनोहर देसाई यांनी आभार मानले.

हेही वाचा 

चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात; छत्री व रेनकोट वाटपाच्या आवाहनाला प्रतिसाद

शाळांची शुल्कवाढविषयक तक्रारीच्या अहवालावर सरकारने निर्णय घेण्याची पालकांची मागणी

मुसेवाला हत्या : संतोष जाधवचे कॅनडातील गँगस्टर गोल्डीशीही कनेक्शन

Back to top button