चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात; छत्री व रेनकोट वाटपाच्या आवाहनाला प्रतिसाद | पुढारी

चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात; छत्री व रेनकोट वाटपाच्या आवाहनाला प्रतिसाद

पुणे, पुढारी वृत्तसेवा: भाजपचे प्रदेशाध्यक्ष, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी पुष्पगुच्छ अथवा भेटवस्तू न देता छत्री व रेनकोट खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात देणगी दिली.
राज्यसभेची निवडणूक संपल्यानंतर पाटील हे शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला पुण्यात पोहोचले. घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत त्यांचे महात्मा सोसायटी कोथरूड येथील बंगल्याजवळ स्वागत केले.

तेथून रॅलीने ते कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. तेथून रॅलीनेच आशिष गार्डन सभागृहात दाखल झाले. उद्योजक समीर पाटील यांच्या पत्नी स्मिता पाटील यांनीही या आवाहनास प्रतिसाद देऊन दोन लाख 51 हजार रुपयांचा धनादेश दिला. अनेक कार्यकर्त्यांनी, पदाधिकार्‍यांनी हजारो रुपयांचा निधी या कामासाठी यावेळी दिला.

चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील यादेखील आज आवर्जून या कार्यक्रमाला त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. कार्यक्रमाला पुनीत जोशी, तनिषा समीर पाटील, प्रकाश बालवडकर, मयुरी प्रणव बालवडकर, अतुल चाकणकर, माधुरी शिवाजी चाकणकर, सुरेखा जगताप, मंदार घुले, कल्पना घुले, स्वाती मोहोळ, विष्णू हरीहर, आशिष गोयल, तुषार पाटील, तेजपाल जैन, सनी लांडे, भरत लायगुडे, आकाश थोरात, सचिन हांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. महिला व युवकांची संख्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात होती. कोथरूड तसेच पुणे शहरामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेले होते.

रक्कम गरजू लोकांसाठी

भाजपचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच कोथरूड मतदारसंघातील नागरिक तेथे मोठ्या संख्येने जमले होते. पुष्पगुच्छ, भेटवस्तू न देता, ती रक्कम निधी म्हणून येत्या पावसाळ्यात पावसापासून बचाव करण्यासाठी गरीब व गरजू लोकांना रेनकोट व छत्री देण्यासाठी जमा करावी, असे आवाहन पाटील व त्यांच्या निकटवर्तीयांनी केले होते. त्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला.

 

Back to top button