पिंपरी: पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता पतीने परस्पर दुसरा विवाह; तिघांवर गुन्हा दाखल | पुढारी

पिंपरी: पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता पतीने परस्पर दुसरा विवाह; तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता पतीने परस्पर दुसरा विवाह केला. तसेच, सासरच्यांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 जून 2004 ते 8 जून 2022 या कालावधीत दिघी, केरळ येथे घडला. विनयदास हरिदास नांबियार (वय 44), श्रीदेवी हरिदास नांबियार (वय 65), हरिलाल विनयदास हरिदास नांबियार (39, सर्व रा. केरळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

वाकड येथे पोलिसांनी सापळा रचून पकडला 24 किलो गांजा

याप्रकरणी पीडित विवाहितेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा पती विनयदास याने फिर्यादीला कोणताही घरखर्च न देता, फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच, फिर्यादी यांच्याशी घटस्फोट न घेता त्याने दुसरे लग्न केले. व्हिसा मिळविण्यासाठी फिर्यादी यांची खोटी कागदपत्रे अमेरिका व भारतात सादर केली, अशी फिर्यादी यांना शंका आहे. लग्नानंतर अन्य आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे माहेराहून पैसे आणावे यासाठी छळ केला. तसेच, फिर्यादी यांना सासरी नांदवण्यास नकार दिला.

Back to top button