वाकड येथे पोलिसांनी सापळा रचून पकडला 24 किलो गांजा | पुढारी

वाकड येथे पोलिसांनी सापळा रचून पकडला 24 किलो गांजा

पिंपरी : गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून वाकडमधील सम्राट चौकात कारवाई करून वाकड पोलिसांनी 24 किलो गांजा पकडला. ही कारवाई बुधवारी (दि. 8) सकाळी साडेनऊ वाजता करण्यात आली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

वासरावर बिबट्याचा हल्ला, मांढर खोर्‍यात बिबट्याची दहशत; परिसरात भीतीचे वातावरण

श्रीकांत लिंबाजी राठोड (वय 33, रा. बालेवाडी. मूळ रा. सोलापूर), सुनील लालसिंग राठोड (वय 31, रा. सोलापूर), तानाजी दगडू पवार (वय 42, रा. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हवालदार वंदू जिरे यांनी फिर्याद दिली आहे.

 

Back to top button