पिंपरी: ‘हुमणी’ नियंत्रणाचे शेतकर्‍यांना प्रशिक्षण | पुढारी

पिंपरी: ‘हुमणी’ नियंत्रणाचे शेतकर्‍यांना प्रशिक्षण

मोशी : पुढारी वृत्तसेवा

कृषी विभागामार्फत हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याबाबत शेतकर्‍यांना नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहायक रुपाली भोसले यांनी सांगितले, की एकात्मिक व्यवस्थापन प्रणालीत विविध प्रकारचे सापळे वापरुन कीड नियंत्रण करता येते. हुमणीत दोन प्रकार आढळतात. त्यास नदीकाठावरील लिकोफोलीस आणि माळावरील होलोट्रँकिया असे संबोधले जाते.

तसेच, नवीन दोन प्रकारच्या हुमणी प्रजाती फायलोग्यथस व अँडोरेटस आढळल्या आहेत. महाराष्ट्रत होलोट्रँकिया सेरेटा या हुमणीच्या प्रजातीपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सर्वात जास्त ऊस, भुईमूग, ज्वारी, बाजरी व मका या पिंकावर हुमणी कीड आढळते. त्यासाठी किडींचा जीवनक्रम जाणून प्रौढ व अळी अवस्थांचा नाश सामुदायिकरीत्या करणे आवश्यक आहे.

पिंपरी: सीडीएस परीक्षेत आदित्य देशात 20 वा

याप्रसंगी प्रगतशील शेतकरी अश्विन घारे, हर्षदा गराडे, शांताराम घारे उपस्थित होते. कृषी सहायक रूपाली भोसले यांनी प्रात्यक्षिक करुन दाखविले. मंडल कृषी अधिकारी खाडे व तालुका कृषी अधिकारी साळे यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

प्रकाश सापळयाचा वापर करा किडीच्या प्रौढ अवस्थेमध्ये कीड नष्ट होण्यासाठी लाईटचा (बल्ब) वापर करुन त्याद्वारे किडींना आकर्षित केले जाते. रात्रीच्या वेळेस संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत या प्रकाशाद्वारे कीड आकर्षित करता येते.

आकर्षित झालेले किडे मारण्यासाठी या प्रकाशाच्या खाली एका पसरट भांड्यात किटकनाशक व रॉकेलचे द्रावण ठेवले जाते. या द्रावणात पडणारे किडे हे मारले गेल्यामुळे शेतीतील कीड नियंत्रणात येते, असे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

पिंपरी: थेरगाव-हिंजवडी रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग

पिंपरी: अखेर डांगे चौकातील मुख्य रस्त्याचे काम सुरू

पिंपरी: मान्सूनपूर्व कामाची नाणे मावळात लगबग; जनावरांचा चारा ठेवला झाकून

 

Back to top button