

वाकड : थेरगाव ते हिंजवडी रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी केली जात असल्यामुळे परिसरात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. थेरगाव ते हिंजवडी दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.
येथे सायंकाळच्या वेळी नागरिक रस्त्यावरच दुचाकी, चारचाकी वाहन पार्क करून नाष्टा करण्यात मग्न असतात. डांगे चौकातील सबवेवरून यूटर्न घेवून वाहने पुढे हिंजवडीकडे जातात. या वेळी रस्त्यावर लावलेल्या गाड्यांमुळे वाहतूककोंडी होत आहे.
सायंकाळची वेळेला ऑफिसमधून सुटल्यानंतर नाष्टा करण्यासाठी नागरिक या ठिकाणी थांबत असून उलट्या दिशेने येणारा वाहनांमुळे वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यामुळे प्रशासनाने रस्त्यावर वाहने लावणार्यांवर कारवाई करण्याची माणगी केली जात आहे.
हेही वाचा