यंदाही राबवणार ‘सेतू’ अभ्यासक्रम; एम. डी. सिंह यांनी केले वेळापत्रक जाहीर | पुढारी

यंदाही राबवणार ‘सेतू’ अभ्यासक्रम; एम. डी. सिंह यांनी केले वेळापत्रक जाहीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा

गेल्यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे वर्षभर शाळा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षात पुन्हा सेतू अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाचे संचालक एम. डी. सिंह यांनी त्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे.

कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी गेल्या वर्षी पहिल्यांदा सेतू अभ्यासक्रम राबवण्यात आला. या अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी केलेल्या अभ्यासात सेतू अभ्यासक्रम परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांतील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी असल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर पुन्हा सेतू अभ्यासक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आधीच्या इयत्तांमधील महत्त्वाच्या क्षमता पूर्ण होण्याच्या दृष्टीने सेतू अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थिकेंद्रित आणि कृतिकेंद्रित अशा दिवसनिहाय कृतिपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत.

अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचे वेळापत्रक

कार्यवाही               राज्यातील शाळा        विदर्भातील शाळा
पूर्व चाचणी         18 जून                           1 आणि 2 जुलै
सेतू अभ्यासक्रम  20 जून ते 23 जुलै           4 जुलै ते 6 ऑगस्ट
उत्तर चाचणी      25 ते 26 जुलै                  8 ते 10 ऑगस्ट

हेही वाचा 

पुण्यातून नगर, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबादसाठी सेवा; महामंडळाचे पहिल्या टप्प्यात नियोजन

नाशिक : जि. प. अभियंता लाच घेताना जाळ्यात

आधी घरात उमेदवार निवडा; प्रवीण दरेकर यांचा रोहित पवारांना टोला

Back to top button