विमा कंपन्यांकडून मागवले प्रस्ताव; पालिकेचे निविदेसाठी जाहीर प्रकटन | पुढारी

विमा कंपन्यांकडून मागवले प्रस्ताव; पालिकेचे निविदेसाठी जाहीर प्रकटन

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेचे आजी-माजी कर्मचारी, अधिकारी आणि आजी-माजी नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय उपचारासाठी महापालिका प्रशासनाने विमा कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. या संदर्भातील निविदेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आजी-माजी कर्मचारी, अधिकारी आणि नगरसेवक यांच्या कुटुंबीयांसाठी महापालिकेकडून अंशदायी वैद्यकीय सहाय्यता योजना (सी.एच.एस.) राबविली जाते. या योजनेंतर्गत खर्चापैकी 90 टक्के रक्कम अदा करण्यात येते. दरम्यान, महापालिका प्रशासनाने सी.एच.एस.ऐवजी आजी-माजी कर्मचारी व आजी-माजी नगरसेवक यांचा विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी खासगी वीमा कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी ब्रोकर नियुक्त करण्यात येणार आहे.
यासंबंधी आरोग्य विभागाने जाहिरात प्रसिद्ध करून निविदा मागविली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात महापालिका कर्मचारी व कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असून, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अंशदायी वैद्यकीय सहाय्यता योजनेतील सर्व लाभ ही योजना विमा कंपनीकडे गेली तरी कायम राहणार आहेत. यात महापालिका सेवकांचे कोणतेही नुकसान होणार नसून, उलट महापालिकेचे पैसे वाचणार आहेत. सध्या केवळ ब्रोकर नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आली आहे.

                                                   – डॉ. मनीषा नाईक, प्रभारी आरोग्य प्रमुख

हेही वाचा

Sanjay Biyani murder case : सातवा हस्तक जाळ्यात; पतियाळा येथून उचलले

नाशिक : जिल्हा परिषदेतील 32 कर्मचारी निवृत्त

‘झाडू’ने कोणाची होणार राजकीय साफसफाई

Back to top button