नाशिक : जिल्हा परिषदेतील 32 कर्मचारी निवृत्त | पुढारी

नाशिक : जिल्हा परिषदेतील 32 कर्मचारी निवृत्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांमधून मंगळवारी (दि. 31) जवळपास 32 कर्मचारी निवृत्त झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांची गर्दी व कार्यालयांमधील निरोप समारंभ यांचीच रेलचेल होती.

सध्या निवृत्तीच्या टप्प्यावर असलेल्या बहुतेकांच्या जन्मतारखा माहीत नसल्यामुळे शिक्षकांनीच मे अथवा जूनमधील जन्मतारखा लिहिल्यामुळे मे व जूनमध्ये निवृत्त होणार्‍यांचे प्रमाण इतर महिन्यांपेक्षा अधिक असते. त्यामुळे 31 मे रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात व जिल्हाभरात कार्यरत असलेले अनेक कर्मचारी निवृत्त झाले. जिल्हा परिषदेत यापूर्वीच 3 हजारांपेक्षा कर्मचार्‍यांची पदे रिक्त असून, त्यात प्रत्येक महिन्याला या निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांमुळे भर पडत असल्याचे चित्र आहे. सुरक्षारक्षक निवृत्त जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे गोविंद बस्ते 43 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. भारतीय लष्करात 17 वर्षे नोकरी केल्यानंतर सहकार विभागात काही वर्षे नोकरी केल्यानंतर ते जिल्हा परिषदेत रुजू झाले होते. जिल्हा परिषदेत त्यांनी अनेक वर्षे सुरक्षारक्षक म्हणून सेवा बजावली. तिन्ही विभागांमध्ये मिळून त्यांनी 43 वर्षे सेवा बजावली.

एक दिवसाचे बीडीओ
राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने 31 मे या दिवशी शासन निर्णयाद्वारे राज्यातील 72 सहायक गटविकास अधिकार्‍यांना गटविकास अधिकारीपदी पदोन्नती करण्यात आली. त्यातील सात जणांचा सेवानिवृत्तीचा दिवस व पदोन्नतीचा दिवस एकच असल्याने या सात जणांनी केवळ एक दिवसासाठी बीडीओ होण्याचा मान मिळाला. नाशिकमधील येवल्याच्या गटविकास अधिकारीपदी पदोन्नतीने नंदुरबार येथून आलेले सोनवणे यांनीही एक दिवसासाठी पदभार घेतला.

हेही वाचा:

Back to top button