पुणे : लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कातील आणखी एकाला जम्मू-काश्मीरमधून बेड्या

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लष्कर-ए-तोयबा संघटनेत भरती करण्यासाठी कार्यरत असलेल्या आणखी एका व्यक्तीला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) स्थानिक पोलिसांच्या मदतीने जम्मू-काश्मीर येथे अटक केली. त्याला स्थानिक न्यायालयाने प्रवासी कोठडी मंजूर केली. त्यामुळे त्याला पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एटीएस पथक त्याला पुण्याकडे घेऊन रवाना झाले आहे.

आफताब हुसेन शाह (२८, रा. किस्तवाड प्रांत, जम्मू-काश्मिर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आफताब हा मुळचा जम्मू-काश्मीरच्या किस्तवाड प्रांतातील रहिवासी असून तो व्यवसायाने सुतार आहे. त्याची तेथे जमीन देखील आहे. तो जुनैद मोहम्मद आणि विदेशात लष्कर-ए-तोयबासाठी काम करणार्‍या हस्तकांच्या संपर्कात होता.

दरम्यान, बोपोडी परिसरातून २४ मे रोजी मोहम्मद जुनैद मोहम्मद याला एटीएसने अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत आफताब याची माहिती मिळाली होती. त्यानंतर एटीएस पथकाने थेट जम्मू-काश्मीर गाठून कारगील, गंदरबाल, श्रीनगर विविध ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी आफताब हा श्रीनगर पासून २११ किलोमीटर लांब असलेल्या किश्तवार येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आफताबला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटकेनंतर केलेल्या चौकशीत महत्वपूर्ण माहिती एटीएसच्या हाती लागण्याची शक्यता आहे. एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त अरूण वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसच्या निरीक्षक मंजुषा भोसले तपास करत आहेत.

भारतात घातपाताच्या कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न

भारतात घातपाताच्या कारवाया घडवून आणण्यासाठी, जातीय सलोखा धोक्यात आणण्यासाठी तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लष्कर-ए-तोयबा संघटनेत भरती केल्याचा धक्कादायक प्रकार दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नुकताच उघड केला. या प्रकरणात तिघे फरार असून तिघेही मुळचे जम्मू काश्मीर येथील आहे. तिघेही लष्कर-ए-तोयबाशी संबधीत आहेत. २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान फरार असलेल्या जुनैदचा साथीदार याने एक अन्सर गझवातुल हिंद / तवाहीद नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपच्या माध्यमातून देश विरोधी पोस्ट व दहशावादासंबंधी पोस्ट टाकून ग्रुप मधील इतर सदस्यांना उत्तेजित केले जात होते. त्याच ग्रुपचा जुनैद आणि आफताब सदस्य असल्याचे सुत्रांनी सांगितले.

जुनैद हा जम्मू-काश्मिर मध्ये भेटला?

जुनैद सहा वेळा जम्मु काश्मिरला गेला होता. तेथे तो आफताबला भेटला होता का ? भेटला असेल तर दोघे कोठे भेटले ? त्यांचे कशा पध्दतीने लष्कर-ए-तोयबासाठी संघटनेत भरती करण्याचे काम सुरू होते. दोघांनी किती जणांना या प्रवाहात आणले याचा एटीएसकडून तपास सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. देशातील कोणत्या ठिकाणांची रेकी करण्यात आली? घातपात व दहशतवादी कारवायासाठी शस्त्रसाठा आला आहे, याचा तपास सुरू आहे. त्यामुळे आता आफताबला अटक झाल्याने त्याच्या पोलिस कोठडीत महत्वपूर्ण धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news