माजी आमदार अनिल गोटे यांच्यावर गुन्हा दाखल करा; अन्यथा आंदोलन छेडण्याचा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा इशारा | पुढारी

माजी आमदार अनिल गोटे यांच्यावर गुन्हा दाखल करा; अन्यथा आंदोलन छेडण्याचा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा इशारा

 पुढारी वृतसेवा 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी चौंडी येथील शासकीय कार्यक्रमात अनिल गोटे यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व उत्सव समिती, मनसे, भाजपच्या वतीने २ जून रोजी खर्डा चौकात निषेध करण्यात आला. तसेच माजी आमदार अनिल गोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या कार्यक्रमात अनिल गोटे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा गौरव करताना देशात होऊन गेलेल्या लोकोत्तर राजमाता व महाराणी यांविषयी अतिशय खालच्या पातळीवरचे बेजबाबदार वक्तव्य केले. तसेच अपशब्द वापरुन त्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. या संबंधीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

विधानसभेसाठी राहुल जगतापांच्या पाठीशी : बाबासाहेब भोस

निषेध करताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उत्सव समितीनं म्हटले आहे की, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर हे सकल हिंदुसमाजाचे आराध्य दैवत असून, आम्हा सर्व शिवप्रेमी व नागरिकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी या पूजनीय व वंदनीय आहेत. हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. त्यांचा गौरव करताना जाणून बुजून जातीपातीत तेढ निर्माण व्हावी या हेतूने या महाशयांनी देशात होऊन गेलेल्या राष्ट्रकार्य करणाऱ्या असंख्य राजमाता व महाराणी यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत. यावेळी तेथे व्यासपीठावर अनेक नेते मंडळी, मंत्रीमंडळातील मंत्री, पालकमंत्री तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार हे देखील उपस्थितीत असताना अनिल गोटे यांना हे गल्लीच्छ वक्तव्य करताना कोणत्याही नेत्यांनी त्यांना अडवले नाही किंवा माफी देखील मागायला लावली नाही.

निमित्त जयंतीचे; मात्र चाचपणी गट-गणाची : आमदार रोहित पवारांच्या द़ृष्टीक्षेपात ज्येष्ठ का युवा

व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच नेते गप्प ?

व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मुग गिळून गप्प बसलेल्या आणि माजी आमदाराच्या या वक्तव्याविषयी चकार शब्दही न काढणाऱ्या तथाकथित मातब्बर नेते मंडळींचा देखील आम्ही सर्व शिवप्रेमी व ग्रामस्थ निषेध करत आहोत. याप्रकरणी जबाबदार असलेल्या माजी आमदार अनिल गोटे यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल व याचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रात उमटतील असा इशारा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आला आहे.

 

Back to top button