अवैध धंद्यांवर ‘सामाजिक’चा बडगा; दोन दिवसात तीन ठिकाणी कारवाई

अवैध धंद्यांवर ‘सामाजिक’चा बडगा; दोन दिवसात तीन ठिकाणी कारवाई
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसापासून शहरातील अवैध धंद्यांवर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाईचा जोरदार धडाका लावला आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगारांना पळता भुई थोडी झाली आहे. कधी सामाजिकचे पथक आपल्या हद्दीत दस्तक देईल, याची धास्ती प्रभारींनी घेतली आहे. सामाजिक विभागाला शहरातील अवैध धंदे दिसतात मात्र इतरांना का नाही असा सवाल देखील उपस्थित गेला जात आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईचा बहुतांश अवैध धंदे चालकांनी धसका घेतला असला तरी, अद्यापही चोरी छुपे चालणार्‍या अवैध धंद्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणीक हे बडगा उगारत आहेत. मागील दोन दिवसात विभागाने 3 ठिकाणी कारवाई करताना 53 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तिन्ही कारवाया पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या सुचनेनुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणिक, उप निरीक्षक श्रीधर खडके, सुप्रिया पंढरकर, यांच्या पथकाने केली.

फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटक्याच्या धंद्यावर कारवाई

फरासखाना पोलिस ठाण्यात अवैधरित्या मटक्याचा धंदा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी 31 मे रोजी रात्री अचानक छापा टाकला. शुक्रवार पेठ, सीटी पोस्ट ऑफीसच्या पाठीमागे, महाराष्ट्र मित्र मंडळाजवळची बिल्डिंग, क्रांती हॉटेल चौक,पुणे येथील इमारतीच्या तळमजल्यावरील एका खोलीत सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबमध्ये तीन पत्त्यावरचा जुगार, पैशावर गैरकारदेशीरीत्या खेळत व खेळवत असताना अनेक जण सापडले.

यात अतुल उमापती, सुहास दाकले, महादेव वोकेफोड, भोलेनाथ बनसोडे, इंद्रजीत पाटील, निखिल मारणे, परशुराम नाडर, तुकाराम मारणे, मंदार काळे, तुषार बहुले, निखिल शिरसागर, ऋषिकेश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून 77 हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

धनकवडी परिसरात कारवाई

बुधवारी (दि. 1) अवैध मटक्याच्या व जुगाराच्या धंद्याबाबत मिळालेल्या बातमीनुसार, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धनकवडी परीसरात, सावरकर चौकाजवळील फाईव्ह स्टार सोसायटी येथे तळमजल्यावरील एका वन रुम, किचन सदनिकेत बेकायदेशीर कल्याण ओपन मटका जुगार, पैशावर गैरकारदेशीरीत्या खेळत व खेळवत असलेचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

२३ जणांवर गुन्हा

यावेळी जुगार खेळणारे 15, खेळवणारे 6 व फरार 2 अशा 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कांतीलाल काळे, इसाक शेख, समाधान वाघमारे, विकास कसबे, बबन रणखांबे, संदीप कांबळे, अर्जुन कदम, विनोद पवार, पांडुरंग इंगळे, सुनील सूर्यवंशी, अनिल गायकवाड,संजय शिंदे, दिगंबर सौंदरकर,विनायक डांगे, संतोष शेवते, चंद्रकांत तोडकर, अजित सपकाळ, सिद्धाराम पाटील, विष्णू ढगे, ज्ञानेश्वर कुचेकर, संदीप येनपुरे यांना अटक करण्यात आली. तर सुनिल निर्मल, जुगार मालक किशोर कांबळे, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी एक लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.

के. के. मार्केट परिसरातील मटक्याच्या अड्ड्यावर कारवाई

बुधवारी (दि. 1) सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये के. के. मार्केट ट्रक टर्मिनल, शंकर महाराज मंदिराजवळ, सातारा रोड येथील दत्तात्रय गॅरेज पार्किंग कंपाऊंडमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर कल्याण ओपन मटका व पंती पाकोळी जुगार, पैशावर खेळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सायंकाळी सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून कारवाई केली.

यावेळी जुगार खेळणारे 3, खेळवणारे 3 व पाहीजे आरोपी 2 असे एकूण 8 जणांवर कारवाई करण्यात आली. सुनील क्षिरसागर, उदय कहार, रोहित गायकवाड, सचिन रणवरे, प्रकाश सरवदे, कृष्णा जगदाळे, यांना अटक करण्यात आली. तर जुगार मालक गणेश कदम, किशोर कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी 25 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news