साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : साकीनाका Sakinaka Rape Case बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी मोहन चौहान याला दोषी ठरवत दिंडोशी सत्र न्यायालयाने आज ( दि. २) फाशीची शिक्षा सुनावली. मुंबई येथील साकीनाका परिसरात गेल्या वर्षी 30 वर्षीय महिलेवर बलात्कार झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान पीडीत महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.

या प्रकरणातील आरोपीला मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा अवघ्या १८ दिवसांत तपास पूर्ण केला होता. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. दिंडोशी न्यायालयाने आरोपी मोहन चौहान याला बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

काय होती घटना?

अंधेरीतील साकिनाका परिसरात एका महिलेवर झालेल्या लैगिंक अत्याचारासह हत्याप्रकरणाचा फैसला गुरुवारी दिडोंशी विशेष सत्र न्यायालयाने जाहीर केला. आरोपी मोहन चौहाण याला न्यायालयाने फाशीसह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. लैगिंक अत्याचार आणि हत्येची ही दुर्मिळातील दुमिळ घटना असल्याचे नमूद करताना न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षाच योग्य असल्याचे मत व्यक्त केले. या वृत्ताला तपास अधिकारी आणि एसीपी ज्योत्सना रासम यांनी दुजोरा दिला आहे.

गेल्या वर्षी १० सप्टेंबर महिन्यांत साकिनाका येथे राहणार्‍या एका महिलेवर तिच्याच परिचित मोहन चौहाणने लैगिंक अत्याचार करुन तिची निर्घृणरीत्या हत्या केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच उत्तरप्रदेशातील गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मोहन चौहानला साकीनाका पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली होती. याच गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध २८ सप्टेंबरला म्हणजे गुन्ह्यांच्या तेराव्याच दिवशी विशेष पथकाने ३४६ पानांचे विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.

या आरोपपत्रात त्याच्याविरुद्ध ७७ साक्षीदारांची जबानी नोंदविण्यात आली होती. या जबानीसह आरोपीविरुद्ध भक्कम वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व पुरावे सादर करण्यात आले होते. मोहनविरुद्ध ३०२, ३७६, २३२, ५०४, ३४, भादवी सहकलम ३ (१), (डब्ल्यू), ३ (२), (अ) अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ अन्वये कलमांतर्गत आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या घटनेने संपूर्ण मुंबई शहरात संतापाची लाट उसळली होती.

त्यामुळे हा खटला जलदगती न्यायालयात चालणार असल्याचे गृहविभागाने जाहीर केले होते. या गुन्ह्यांचा एसीपी ज्योत्सना रासम यांच्यासह अन्य पोलीस पथकाने तपास केला. तर पोलिसांच्या वतीने सरकारी वकिल म्हणून राजा ठाकरे, अॅड. महेश मुळे यांनी न्यायालयात बाजू मांडली होती. एखाद्या गुन्ह्यांत इतक्या जलदगतीने आरोपपत्र सादर होण्याची ही पहिलीच घटना होती. या खटल्याची सुनावणी सोमवारी (दि.३०) पूर्ण झाली. यावेळी विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आरोपी मोहन चौहानला दोषी ठरविले होते. त्याच्या शिक्षेवर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तीनी मोहन चौहानला फाशीची शिक्षा सुनावली. तसेच वेगवेगळ्या कलमांतर्गत त्याला काही दंडही ठोठावण्यात आला.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news