वसंत मोरे शिवबंधन बांधणार का; संजय राऊत आणि वसंत मोरे यांच्या भेटी मुळे चर्चेला उधाण | पुढारी

वसंत मोरे शिवबंधन बांधणार का; संजय राऊत आणि वसंत मोरे यांच्या भेटी मुळे चर्चेला उधाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्यांच्या आंदोलनावरुन पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी भोंग्याच्या विषयावर उघड नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांना शिवसेनेसह अनेक मोठ्या पक्षांच्या ऑफर आल्या होत्या.

अशातच आज वसंत मोरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पुण्यात एका लग्न समरंभा दरम्यान भेट झाली आहे. यामुळे वसंत मोरे शिवसेनेत जाणार, शिवबंधन बांधणार का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

आरक्षणाने आघाडीत बिघाडी; पंधरा प्रभागांत होणार रस्सीखेच

पुण्यात एका लग्नात वसंत मोरे आणि संजय राऊत यांची भेट झाली होती. संजय राऊतांनी वसंत मोरे यांना नावाने नाही तर ‘तात्या’ म्हणून ओळखले. याशिवाय, आगामी निवडणुकीसाठी प्रभाग कुठला? जागा कशी सुटली, आरक्षण कसे आहे, याची संजय राऊत यांनी मोरेंकडे विचारपूस केली.

व राऊतांनी वसंत मोरे यांच्या कामाचे कौतुकही केले. जाता जाता संजय राऊत यांनी ‘भेटू’ असे म्हंटले. यावरुन मनसेमध्ये नाराज असलेले वसंत मोरे राऊतांनी पक्षात येण्याची अप्रत्यक्ष ऑफरच दिल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

यबाबत वसंत मोरे यांना विचारले असता आपण कुठेही जाणार नसून, राज साहेबांसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केले आहे. परंतु, आज संजय राऊत यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वसंत मोरे शिवबंधन बांधणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

हेही वाचा

पडळकरांच्या अडचणी वाढल्या; कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुण्यातील दोन जवानांचा मरपल्लीत एकमेकांवर गोळीबार; दोघेही ठार

औरंगाबाद : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीसह ६ जणांविरोधात गुन्हा

Back to top button