पुण्यातील दोन जवानांचा मरपल्लीत एकमेकांवर गोळीबार; दोघेही ठार | पुढारी

पुण्यातील दोन जवानांचा मरपल्लीत एकमेकांवर गोळीबार; दोघेही ठार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मरपल्ली येथे तैनातीस असलेल्या पुण्यातील राज्य राखीव पोलिस दलाच्या दोघा जवानांनी एकमेकांच्या दिशेने केलेल्या गोळीबारात दोघांचाहीजागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

गडचिरोली : ७५ वर्षीय वृद्धेचा उष्माघाताने मृत्यू

दोन्ही जवानांमध्ये किरकोळ कारणातून वैयक्तिक वाद झाला. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना शिविगाळ केल्याने वातावरण आणखी चिघळले आणि त्याचे पर्यवसान एकमेकांवर रायफलने फायर करण्यात झाले, अशी प्राथमिक माहिती असून, हे दोघेहीजागीच ठार झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचे समन्स

श्रीकांत बेरड व बंडू नवथरे अशी या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या जवानांची नावे असून, दोघेही पुणे जिल्ह्यातील दौंड येथील SRP कॅम्पचे जवान आहेत. घटनेचीमाहितीकळताच वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, दोन्ही शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचा

येस बँक-डीएचएफएल घाेटाळा प्रकरण : अविनाश भोसले यांना सीबीआयने चौकशीसाठी दिल्लीला आणले

GST collection : वस्तू व सेवा कर संकलनात एप्रिलच्‍या महिन्‍याच्‍या तुलनेत १६.६ टक्क्यांची घट

घटनात्मक न्यायालयांचा आदेश वैधानिक लवादांवर बंधनकारक राहील : सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

Back to top button