UPSC Pune Result : दौंड तालुक्यातील पडवी येथील सोहम मांढरे याचे यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश | पुढारी

UPSC Pune Result : दौंड तालुक्यातील पडवी येथील सोहम मांढरे याचे यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश

पाटस; पुढारी वृतसेवा : दौंड तालुक्यातील पडवी गावच्या सोहम मांढरे या विद्यार्थ्याने देशातील सर्वोच्च व कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परिक्षेत देशात २६७ च्या रँकने यश मिळवले. त्याने दौंड तालुक्याचे नाव शिखरावर नेहून ठेवले असून पडवी गावची मान उंचावली असल्याचा अभिमान तालुक्यातील नागरिकांना वाटू लागला आहे.

सन २०२१ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी (दि. ३०) जाहीर करण्यात आला. देशात एकूण ६८५ उमेदवारांपैकी सुमारे ९० विध्यार्थी हे महाराष्ट्रातील असून त्यांनी यश संपादन केले आहे. या परीक्षेत पडवी (ता.दौंड) येथील सोहम मांढरे याने देशात २६७ चा रँक मिळवत यश संपादित केले आहे, तर महाराष्ट्रातील उमेदवारांत तो २२ वा आहे.

या देशाच्या यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या पहिल्या १०० विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील ५ विद्यार्थां आहेत तर राज्यात सोहम मांढरे हा २२ व विद्यार्थी आहे.

हेही वाचा

Back to top button