UPSC Result 2022 : शुभमच्या यशाने लातुरकरांची गुणवत्ता देशपातळीवर पुन्हा उजळली

UPSC Result 2022 : शुभमच्या यशाने लातुरकरांची गुणवत्ता देशपातळीवर पुन्हा उजळली
Published on
Updated on

लातूर; पुढारी वृत्तसेवा : ध्येयाशी प्रामाणिक राहत त्याने युपीएसी परीक्षेसाठी रात्रंदिवस अभ्यास केला अन यशाने त्याला गवसणी घातली. हा क्षण अनुभवताना त्याच्या परिवाराला आनंदाने भरते आले. केलेले श्रम सार्थकी लागल्याचे पहाताना आई-वडिलांनही गलबलून आले. शुभम संजय भोसलेच्या (UPSC Result 2022) या यशाने लातुरच्या गुणवत्तेची ओळख पुन्हा देशपातीळीवर अधोरेखित झाली.

किल्लारी (ता. औसा) येथील शुभम भोसलेचे (UPSC Result 2022) वडील वानवडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक तर आई गृहणी आहे. शुभमचे प्राथमिक शिक्षण औशाच्या मुक्तेश्वर विद्यालयात झाले. इयत्ता ५ वी मध्ये त्याने शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होवून शिष्यवृत्ती धारक झाला अन इथेच त्याच्या मनात स्पर्धा परीक्षेचे बिजारोपन झाले. आठवीतही त्याने असे यश मिळवले. दहावीत एनटीएस परीक्षेत तो जिल्ह्यातून दुसरा आला होता. त्याला १० वी मध्ये ९८ टक्के गुण मिळाले होते. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात झाले १२ वीत त्याने ९० टक्के गुण मिळवले. पुढे मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल इंजिनिअरिंग कॉलेज मधून तो पदवीधर झाला.

इंजिनिअरिंग करूनही त्याला लहानपनापासून लागलेली स्पर्धा परीक्षेची आवड कमी झाली नाही. आपण वर्ग एक अधिकारी होऊन आपल्या आईवडिलांचे स्वप्न पुर्ण करायचे व सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची अशी जिद्द   शुभमने (UPSC Result 2022)उराशी बाळगली. युपीएसीच्या तयारीसाठी तो दिल्ली येथे गेला होता. दोन वर्ष तिथे त्याने तयारी केली तथापि पहिल्या प्रयत्नात त्याला यश आले नाही. यामुळ‌े तो नाउमेद झाला नाही. कोरोनामुळे त्याला दिल्ली सोडावी लागली. औसा इथे त्याने रात्रीचा दिवस करुन अभ्यास केला व त्याने युपीएसी परीक्षेत देळपातळीवर १४९ रँक मिळवली.

पहिल्या प्रयत्नात यश मिळले नाही म्हणून खचलो नाही. जिद्दीने अभ्यास केला. माझे आई-वडील व मित्र परिवाराने माझे मनोबल वाढेल अशी साथ दिली. माझ्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे.
– शुभम भोसले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news