UPSC Result : साताऱ्याच्या ओंकार पवारने फडकावला युपीएससी परीक्षेत झेंडा

UPSC Result : साताऱ्याच्या ओंकार पवारने फडकावला युपीएससी परीक्षेत झेंडा

सातारा : पुढारी वृत्तसेवा : साताऱ्यातील जावळी तालुक्यातील सनपाने गावातील ओंकार पवार युपीएससी परीक्षेत (UPSC Result)  १९४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. गावात राहून अभ्यास करत त्यांने या परीक्षेत मिळवलेले यश महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

(UPSC Result)  ओंकार पवार यांचे प्राथमिक शिक्षण सनपाने गावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले. ओंकार मागील वर्षी युपीएससी परिक्षेत ४५५ नंबरने उत्तीर्ण झाला आहे. सध्या ओंकार आयपीएस (IPS) पदावर रुजू झाले आहेत. दरम्यान, गेल्या २ वर्षात ओंकार यांनी गावात राहूनच युपीएससीची सर्व तयारी केली. अतिशय सामान्य कुटुंबातील असलेल्या ओंकार यांचे आई-वडील शेती करतात. घरातील पहिला अधिकारी झाल्यामुळे संपूर्ण घरात आणि गावात सध्या उत्साहाचे वातावरण आहे.

स्पर्धा परीक्षेत पास होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या परीक्षेत अपयश आल्यास विद्यार्थी नैराश्येत जाऊ लागले आहेत. परंतु अपयश आले तरी खचून जाऊ नये. एमपीएससी किंवा युपीएससी हे काही आयुष्य नाही. तर तो एक करीअर ऑप्शन आहे. त्यामुळे परीक्षेत अपयश आले म्हणजे आपण आयुष्यात फेल झालो, असे नाही. हे आजच्या तरुण पिढीने लक्षात ठेवावे, असा मौलिक सल्ला ओंकार पवार यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.


हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news