पुणे : रिक्षा परमिट देणे आता बस्स; रिक्षाचालकांनी व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया | पुढारी

पुणे : रिक्षा परमिट देणे आता बस्स; रिक्षाचालकांनी व्यक्त केल्या संतप्त प्रतिक्रिया

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘रिक्षा थांब्यावर तासन्तास थांबूनही आम्हाला अनेकदा प्रवासी मिळत नाहीत. पूर्वीप्रमाणे धंदा राहिलेला नाही. घर चालवायचे कसे असा प्रश्न आहे. कर्जाचा डोंगर समोर आहे. त्यामुळे आता रिक्षा परमिट वाटप बस्स झाले. आम्हाला आता मरायची वेळ आली आहे,’ असे सांगत होते रिक्षाचालक राजेंद्र मोरे.

दै. ‘पुढारी’च्या वतीने शुक्रवारी (दि.27) रिक्षा परवाना बंदच्या प्रस्तावाबाबतचे वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर दै.‘पुढारी’च्या प्रतिनिधीने ठिकठिकाणी असलेल्या रिक्षा थांब्यांवर जाऊन रिक्षाचालकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या वेळी रिक्षाचालकांनी आरटीओच्या कामकाजाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

शेतीमालाला सतत मिळणार्‍या अल्प दराला कंटाळून जीवन संपवले

मध्यवस्तीत रिक्षा चालविणारे चालक म्हणाले, ‘ग्रामीण भागात रोजगार न मिळालेले अनेक तरुण पुण्यात येतात. 10 ते 11 हजारांमध्ये परमिट काढतात आणि काही टक्के व्याजदरावर कर्ज काढून रिक्षा खरेदी करतात. अशा रिक्षा घेणार्‍या तरुणांमध्ये वाढ झाली आहे. प्रशासनसुध्दा परवाना, बॅच लायसन्सच्या नावाखाली पैसे घेऊन त्यांना तत्काळ परमिट देत आहे. मात्र, रिक्षाचालकांमध्ये वाढलेल्या स्पर्धेचा विचार करत नाही.’

आमच्या रिक्षाचा धंदा निम्म्याने कमी झाला आहे. दैनंदिन उत्पन्न मोठ्या प्रमाणावर विभागले गेले आहे. मोठी स्पर्धा निर्माण झाल्याने घरसंसार चालविणे, नव्या गाडीचे हप्ते भरणे मुश्कील झाले आहे. महिनाकाठी 10 हजार रुपये मिळणेदेखील कठीण होत आहे. त्यामुळे शासनाने खुला परवाना तत्काळ बंद करावा.

                                                       – शिवाजी भालेराव, रिक्षाचालक

हेही वाचा

आर्थिक घोटाळ्यांविरोधातील नवे पर्व म्हणजे फॉरेन्सिक अकाऊंटिंग : डॉ. अपूर्वा जोशी,

पुणे : रोजगार हमी योजनेत उद्दिष्टापेक्षाही अधिक रोजगार उपलब्ध

कौशल्य ओळखून शिक्षण देण्याची गरज : डॉ. अरुण पाटील

Back to top button