

अल्प दराला कंटाळून
शेतकर्याची आत्महत्या
संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा
शेतीमालाला सतत मिळणार्या अल्प दराला कंटाळून तरुण शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी 24 मे रोजी उघडकीस आली. संतोष पांडूरंग लावरे (वय 38 वर्षे, रा. पिंप्री लौकी अजमपूर, ता. संगमनेर) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
पिंप्री लौकी अझमपूर येथील शेतकरी संतोष पांडूरंग लावरे यांच्याकडे उदरनिर्वाहापुरती कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली. अशातच तीन सदस्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीच्या उत्पन्नावर होत नसल्याने लावरे मोलमजुरी करीत होते. सततच्या बिकट आर्थिक परिस्थितीला कंटाळून लावरे यांनी घरापासून थोड्या अंतरावर डोंगर पायथ्याच्या वृक्षाला गळफास घेत आत्महत्या केली.