उरुळी कांचन : शिंदवणेत चिमुरडा मुळा-मुठा उजव्या कालव्यात बुडाला | पुढारी

उरुळी कांचन : शिंदवणेत चिमुरडा मुळा-मुठा उजव्या कालव्यात बुडाला

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा

शिंदवणे (ता. हवेली) येथील काळेशिवार वस्तीवरील गुरुवारी (दि. 26) सायंकाळच्या सुमारास बेपत्ता झालेल्या 2 वर्षीय चिमुरड्याचा मुळा-मुठा उजव्या कालव्यात पडून दुर्दैवी अंत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या चिरमुड्याचा मृतदेह शुक्रवारी (दि. 27) दुपारी यवत (ता. दौंड) येथे कालव्यात आढळला.

फुलाला सुगंध मातीचा : कीर्तीचं आयपीएस बनण्याचं स्वप्न झालं पूर्ण

स्वराज्य गणेश महाडीक (वय 2, रा. काळेशिवार वस्ती, शिंदवणे, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. तो गुरुवार (दि. 26) पासून बेपत्ता असल्याची खबर लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आली होती. अखेर चिरमुरडा कालव्यात पडल्याची भीती खरी ठरून त्याचा मृउरुळी कांचन : शिंदवणेत चिमुरडा मुळा-मुठा उजव्या कालव्यात बुडाला आहे. हा चिमुरडा गुरुवारी सायंकाळी 5 ते 5.20 दरम्यान बेपत्ता झाला होता. पोलिसांकडून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वराजचा तपास सुरू होता. दरम्यान, स्वराजचा मृतदेह आढळून आला आहे.

जि.प. त यश मिळाले नाही तर पदे काढून घेईन; अजित पवारांचा पदाधिकार्‍यांना भर मेळाव्यात इशारा

कालवा संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर

कालव्यात अशाच प्रकारे सोरतापवाडी (ता. हवेली) येथील बहीण-भावंडांचा मृत्यू ओढवल्याची घटना दि. 18 एप्रिल रोजी घडली होती. त्याचप्रकारे कालव्यात बुडून चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना पुन्हा ओढवल्याने कालवा हद्दीत संरक्षणाचा विषय चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा

‘पुढारी’ आयोजित ‘एज्युदिशा 2022’चा आज कोल्हापुरात शानदार प्रारंभ

अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी गौण खनिजाच्या वाहनांना जीपीएस सक्तीचे

कोल्हापूर सारथी उपकेंद्रासाठी अडीच कोटींचा निधी : सतेज पाटील

Back to top button