‘पुढारी’ आयोजित ‘एज्युदिशा 2022’चा आज कोल्हापुरात शानदार प्रारंभ | पुढारी

‘पुढारी’ आयोजित ‘एज्युदिशा 2022’चा आज कोल्हापुरात शानदार प्रारंभ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’च्या वतीने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास दिशा देणारे ‘एज्युदिशा 2022’ शैक्षणिक प्रदर्शन व ज्ञानसत्राचे शनिवार, दि. 28 रोजी कोल्हापूर येथे शानदार उद्घाटन होणार आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना करिअरच्या अगणित संधी एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

दै. ‘पुढारी’ आयोजित व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘एज्युदिशा 2022’ शैक्षणिक प्रदर्शनाचे दि. 28 ते 30 मे दरम्यान राजारामपुरीतील ताराराणी विद्यापीठाच्या व्ही. टी. पाटील मेमोरियल हॉलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. पॉवर्ड बाय स्पॉन्सर आयआयबी-पीसीबी, लातूर असणार आहेत. सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी पुणे व प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी क्लासेस, लातूर आहेत. अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे व सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे हे सहप्रायोजक आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शनिवारी सकाळी 10 वाजता उद्घाटन होईल. याप्रसंगी संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे विश्वस्त विनायक भोसले, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुुलगुरू डॉ. अरुण पाटील, आयआयबी-पीसीबी लातूरचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रा. चिराग सेन्मा, एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी पुणेचेे प्रा. डॉ. राजेश जाधव, प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी क्लासेस, लातूरचे प्रा. प्रमोद घुगे, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणेचे शेफ इबेन मॅथ्यू, सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणेचे गणेश लोहार, दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दै. ‘पुढारी’ आयोजित ‘एज्युदिशा 2022 कोल्हापूर’ हे करिअरसाठी दिशादर्शक व रोजगाराधिष्ठित ज्ञानसत्र विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. तीन दिवस चालणार्‍या या ज्ञान सत्रात करिअरविषयक विविध तज्ज्ञांची अचूक मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. शैक्षणिक प्रदर्शनात नामवंत शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत. प्रदर्शनास उपस्थित राहून उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

प्रदर्शनातील आज होणारी ज्ञानसत्रे
शनिवारी (दि. 28) पहिल्या सत्रास संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाने प्रारंभ होईल. दुपारी 12 ते 1 दरम्यान संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांचे ‘उच्च शिक्षणाचे महत्त्व, आव्हाने व संधी’ या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर दुपारी 4 ते 5 यावेळेत ‘फॉरेन्सिक अकाऊंटमधील ग्लोबल करिअरच्या संधी’ या विषयावर ‘रिक्सप्रो मॅनेजमेंट’च्या संचालिका डॉ. अपूर्वा जोशी मार्गदर्शन करतील. ‘हॉटेल मॅनेजमेंट’ या विषयावर सायंकाळी 5 ते 6 दरम्यान पुण्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठांतर्गत हॉटेल मॅनेजमेंट विद्याशाखेचे तज्ज्ञ शेफ इबेन मॅथ्यू यांचे व्याख्यान होणार आहे.

Back to top button