कोल्हापूर सारथी उपकेंद्रासाठी अडीच कोटींचा निधी : सतेज पाटील | पुढारी

कोल्हापूर सारथी उपकेंद्रासाठी अडीच कोटींचा निधी : सतेज पाटील

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शाहू संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी)च्या कोल्हापूर उपकेंद्रासाठी 2 कोटी 34 लाखांच्या प्रशासकीय खर्चाला सरकारने मंजुरी दिली आहे. राजाराम कॉलेज परिसरातील या उपकेंद्रासाठी या निधीतून संरक्षक भिंत, मुख्य प्रवेशद्वार व अप्रोच रस्त्यांचे बांधकाम होणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. राजाराम कॉलेज परिसरातील पाच एकर जागा ‘सारथी’ला देण्यात आली आहे. या जागेवर मुलांचे व मुलींचे वसतिगृह, अभ्यासिका, प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे.

या उपकेंद्रासाठी 2 कोटी 34 लाख 57 हजार 790 इतक्या रक्कमेच्या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणयात आली आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे सहकार्य लाभल्याचे पाटील म्हणाले.

Back to top button