पुणे : महिलेसह तिघांना खूनप्रकरणी बेड्या; हडपसर ग्लायडिंग सेंटर येथील घटना | पुढारी

पुणे : महिलेसह तिघांना खूनप्रकरणी बेड्या; हडपसर ग्लायडिंग सेंटर येथील घटना

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कारागृह अधिकार्‍याच्या मुलाला ग्लायडिंग सेंटर येथे बोलावून घेत तेथे त्याचा निर्घृण खून करणार्‍या महिलेसह तिच्या तीन साथीदारांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रेमसंबंधांच्या संशयातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. संबंधित महिलेसह अरमान अल्लाउद्दीन शेख (22, रा. रुई माळवाडी, सध्या माळवाडी) त्याचे साथीदार अक्षय जगन्नाथ देवकाते (20), प्रदीप अंकुश चव्हाण (20, रा. मंडई) यांच्यासह एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

गिरीधर ऊर्फ गिरीश उत्तरेश्वर गायकवाड (21, रा. गोपाळपट्टी, घुले पार्क, साई टॉवर, मांजरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गिरीधर यांचा मोठा भाऊ निखीलकुमार उत्तरेश्वर गायकवाड (27) यांनी फिर्याद दिली. गिरीधरचे वडील अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे जेलर आहेत.

हेही वाचा

Back to top button