MPSC : एमपीएससीची तयारी करणार्‍या तरुणाची आत्महत्या

MPSC : एमपीएससीची तयारी करणार्‍या तरुणाची आत्महत्या
Published on
Updated on

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : एमपीएससीची (MPSC)  तयारी करण्यासाठी बहिणीकडे आलेल्या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. महेंद्र देवीदास पाटील (वय २२, रा. आनोरे ता. अमळनेर ) असे मयत तरुणाचे नाव आहे.

अमळनेर तालुक्यातील आनोरे गावातील रहिवासी महेंद्र पाटील हा स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी जळगाव शहरातील आहुजा नगरात बहिण भारती व मेव्हणे हरेंद्र पाटील यांच्याकडे राहायला आला होता. नुकतीच राज्यसेवेच्या जागांची जाहीरात प्रसिध्द झाली आहे. यातील कमी जागा, तसेच पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न भंगल्याने गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची माहिती मयत महेंद्र याचे मेव्हण्यांनी दिली आहे.

घरात कुणी नसल्याचे पाहून केली आत्महत्या

महेंद्र याची बहिण व मेव्हणे हे दि. 22 मे रोजी आनोरे गावात लग्नासाठी गेले होते. महेंद्र यास त्याची बहिणी भारती यांनी मंगळवारी महेंद्रला फोन केला. मात्र त्याचा फोन व्यस्त असल्याने संपर्क होवू शकला नव्हता. त्यामुळे भारती ह्या बुधवारी सुध्दा सकाळपासून महेंद्र यास कॉल करत होत्या, मात्र फोन लागत नव्हता. त्यामुळे भारती यांनी जळगावातील त्यांच्या शेजाऱ्यांना याविषयी विचारपूस करून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानूसार शेजारी घरी गेले असता, दरवाजा आतून लावलेला होता. दरवाजा ठोठावून प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर शेजारच्यांनी तात्काळ तालुका पोलिसांशी संपर्क करून त्यांना माहिती दिली.

खिडकीचे लॉक तोडून केला घरात प्रवेश

घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरिक्षक नयन पाटील, सतीश हाळनोर, अनिल मोरे, संजय भालेराव यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी शेवटच्या बेडरूममधील खिडकीचे लॉक तोडले असता महेंद्र हा ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानुसार दरवाज्याचे लॉक तोडून मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्या नंतर महेंद्रचे वडील, मेव्हणे यांच्यासह नातेवाईकांनी याठिकाणी धाव घेतली.

चिठ्ठीत काय लिहलंय

माझे वडील देव तर आई देवी सारखी आहे. त्यांनी आयुष्यभर माझ्यासाठी खूप काही केलं आहे. माझ्या आयुष्याचा गोल वेगळा होता पण माझ्यासोबत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी महेंद्रने असा मजकूर लिहून त्याने आई वडिलांचे आभार मानले आहेत. पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली आहे. महेंद्र हा शहरातील एका खाजगी क्लासमध्ये होता. त्याचे पीएसआय बनण्याचे स्वप्न होते. काही दिवसांपूर्वी त्याने गृप डी अंतर्गत एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यात त्याला कमी मार्क पडले होते. तर दुसरीकडे नुकत्याच राज्यसेवेच्या शासनाने जागा जाहीर केल्या आहेत. त्या जागा कमी असल्याने महेंद्र नैराश्यात होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची माहिती महेंद्रचे मेव्हणे हरेंद्र पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news