पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक : ३५६ जागांसाठी भरती | पुढारी

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक : ३५६ जागांसाठी भरती

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनामुळे अनेकांना बेरोजगार व्हावं लागले आहे. अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना आता नोकरीची संधी निर्माण झाली आहे.  पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक कडून ३५६ जागांसाठी अर्ज मागविले आहेत. या भरतीची अधिसूचना बँकेने जारी केली आहे.

लेखनिक या पदासाठी ही भरती आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२१ आहे.

पद              जागा

लेखनिक            ३५६

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदवी किंवा पदव्युत्तर डिग्री असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्ष असावे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२१ असणार आहे. या पदाला अर्ज करण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकता.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

सरू आजीला शिव्या कुणी शिकवल्या ?

Back to top button