पुणे : गावच्या राजकारणात भाग घेतल्याने पोलिस पाटील निलंबित | पुढारी

पुणे : गावच्या राजकारणात भाग घेतल्याने पोलिस पाटील निलंबित

शेळ्गाव; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील घोरपडीवाडीचे पोलिस पाटील यांनी गावच्या राजकारणात भाग घेतल्याप्रकरणी घोरपडी येथील गजानन लंबातेसह इतरांनी २२ जून २०१९ रोजी उपविभागीय अधिकार्‍यांकडे दाखल केली होती.

तर पोलिस पाटील याच्याविरोधात २ ऑगस्ट २०२१ रोजी अमोल कांबळे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर उपविभागीय अधिकारी बारामती दादासाहेब कांबळे यांनी अखेर घोरपडवाडीचे पोलीस पाटील नंदकुमार लावंड यांना निलंबित करण्यात आल्याचे केले.

घोरपडी येथील पोलीस पाटील निलंबित करण्यासंदर्भात अधिकाऱ्याकडे घोरपडे येथील ग्रामस्थांनी अर्ज केला होता. मात्र, आमच्या अर्जाची दखल घेतली जात नसल्याने २ ऑगस्ट २०२१ रोजी आम्ही आत्मदहन करू असा इशारा अमोल कांबळेसह इतरांनी दिला होता.

त्यानंतर उपविभागीय अधिकारी बारामती दादासाहेब कांबळे यांनी आंदोलनापासून परावृत्त करत घोरपडवाडीचे पोलीस पाटील नंदकुमार लावंड यांचे निलंबन झाल्याचे सोमवार (दि.२) रोजी स्पष्ट केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडवाडी गावचे पोलिस पाटील नंदकुमार लावंड यांच्या विरोधात गावच्या राजकारणात प्रचार केलेले संभाषण प्राप्त झाले होते.

या घटनेच्या चौकशी अंती नंदकुमार लावंड यांना सोमवार (दि. २) रोजी निलबिंत करण्यात आले असून सदर प्रकरणाची पुढील चौकशी करण्याचे आदेश वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना दिले आहेत.

राजकीय दबावामुळे निलंबन : नंदकुमार लावंड

उपविभागीय अधिकारी बारामती दादासाहेब कांबळे यांनी या प्रकरणी कोणतेही चौकशी केली नसून केवळ राजकीय दबावापोटी त्यांनी हा निलंबनाचा निर्णय दिला आहे.

या निर्णयाविरुद्ध मी मॅटमध्ये जाणार आहे. उपविभागीय अधिकारी बारामती दादासाहेब कांबळे यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सखोल चौकशी व्हावी म्हणून त्याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे असे घोरपडवाडीचे निलंबित पोलीस पाटील नंदकुमार लावंड यांनी माहिती दिली.

हेही वाचलंत का? 

Back to top button