पुणे महापालिकेचे एससी आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण जाहीर | पुढारी

पुणे महापालिकेचे एससी आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण जाहीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या ५८ प्रभागांमधील अनुसुचित जाती (एससी) आणि अनुसुचित जमातीच्या (एसटी) प्रभागांचे आरक्षण बुधवारी महापालिकेने जाहीर केले. यात एससी प्रवर्गासाठी २३ आणि एसटी प्रवर्गाच्या २ जागांचा समावेश आहे. त्यामुळे आता महिला आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले असून त्यानंतरच प्रभागांचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांची अंतिम प्रभाग रचना आणि नकाशे गत आठवड्यात जाहीर केले. त्यानंतर महापालिकेने बुधवारी रात्री संकेतस्थळावर ५८ प्रभागांमधील एससी व एसटी प्रवर्गांचे आरक्षण जाहीर केले. इतर मागासवर्गाचे (ओबीसी) आरक्षण न्यायालयाने रद्द ठरविल्याने प्रशासनाने केवळ एससी आणि एसटी प्रवर्गांचे आरक्षण निश्चित केले आहे.

संबधित प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत असलेली एससी आणि एसटी प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार हे आरक्षण निश्चित करण्यात आले. आता ज्या प्रभागांमध्ये हे आरक्षण निश्चित झाले आहेत. त्यामध्ये महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर नक्की कोणती जागा महिला एससी आणि एसटी यासंबधीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान पन्नास टक्के महिला आरक्षणानुसार ५८ पैकी २९ प्रभागांमध्ये प्रत्येकी २ महिला उमेदवार असणार आहे. एक खुल्या प्रवर्गातील तर एक आरक्षित प्रवर्गातील असणार आहे.

दरम्यान, महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ऑगस्टमध्ये होईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अनुसुचित जातीचे आरक्षित प्रभाग

प्रभाग क्र – प्रभागाचे नाव- लोकसंख्या- एससी-
प्रभाग क्र. २०- पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड – ६७ हजार १२९- १९ हजार ५६२
प्रभाग क्र. ५०- सहकारनगर – तळजाई – ६१ हजार २४४ – १६ हजार ३२
प्रभाग क्र. ४८ – अप्पर सुप्पर-इंदिरानगर – ५६ हजार ८८४ – १४ हजार ६९१
प्रभाग क्र. ८ – कळस – फुलेनगर – ६२ हजार २७३ – १५ हजार ५८७
प्रभाग क्र. २७ – कासेवाडी लोहियानगर – ६८ हजार ५०१ – १६ हजार ६९
प्रभाग क्र. ९  – येरवडा – ७१ हजार ३९० – १६ हजार १३९
प्रभाग क्र. ११ – बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – ६२ हजार २६९ – १३ हजार ११५
प्रभाग क्र. ७ – कल्यानीनगर-नागपुरचाळ – ६७ हजार ७३९ –  १४ हजार १५४
प्रभाग क्र. 37 – जनता वसाहत- दत्तवाडी – ६९ हजार ६७२ – १४ हजार २०९
प्रभाग क्र- ३८- शिवदर्शन -पद्मावती – ६४ हजार २२१ -१३ हजार ४३
प्रभाग क्र. १ – धानोरी-विश्रांतवाडी – ५५ हजार ४८८ – १० हजार ९२७
प्रभाग क्र. ४२ – रामटेकडी-सय्यदनगर – ४९ हजार २५ – ९ हजार ३७०
प्रभाग क्र. २६ – वानवडी गावठाण-वैदुवाडी – ५९ हजार २० – १० हजार ९९३
प्रभाग क्र. २२ – मांजरी बुद्रुक-शेवाळवाडी – ६१ हजार ८७८ – ११ हजार ४९४
प्रभाग क्र. १० – शिवाजीनगर गावठाण- संगमवाडी- ६२ हजार ४८१ – ११ हजार ४९४
प्रभाग क्र. ३९ – मार्केटयार्ड-महर्षीनगर – ६० हजार ५३७ – १० हजार ८५४
प्रभाग क्र. २१ – कोरेगाव पार्क – मुंढवा – ६७ हजार ५७४ – ११ हजार ७६१
प्रभाग क्र. ४७ – कोंढवा बु.-येवलेवाडी – ५४ हजार ४९२ – ९ हजार २०६
प्रभाग क्र. ४६ – मोहमंदवाडी-उरुळी देवाची – ५२ हजार ७२०- ८ हजार २६
प्रभाग क्र. १९ – छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम- रास्ता पेठ – ५८ हजार ९९४ – ८ हजार ७८५
प्रभाग क्र.- ४ – पुर्व खराडी- वाघोली- ५८ हजार ९१२ – ८ हजार ५६४
प्रभाग क्र- १२ – औंध-बालेवाडी – 63 हजार 362- 8 हजार 996
प्रभाग क्र. ३ – लोहगाव- विमाननगर – ६१ हजार ८३६ – ८ हजार ५९२

अनुसुचित जमाती आरक्षित प्रभाग

प्रभाग क्र.-१ – धानोरी- विश्रांतवाडी – ५५ हजार ४८८ – १ हजार ६५२ (एसटी )
प्रभाग क्र. १४ – पाषाण – बावधान बुद्रुक – ५७ हजार ९९५ – १ हजार ६२८ (एसटी)

Back to top button