पुण्यात बालगंधर्वसमोर राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांचा राडा | पुढारी

पुण्यात बालगंधर्वसमोर राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांचा राडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी बालगंधर्व रंगमंदिरात आलेल्या मंत्री स्मृती इराणी यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने सोमवारी जोरदार राडा झाला. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले. यावेळी काही महिला नेत्यांना मारहाण झाल्याचंही समजते.

मान्सून अंदमानात दाखल, केरळमध्ये पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण

स्मृती इराणी यांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच निषेध केला आहे. महागाईच्या मुद्द्यावर त्यांनी बोलावं अशी मागणी करत सकाळी हॉटेल जे डब्ल्यू मॅरिएट इथं माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत, फलक हातात घेऊन त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तर बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.

काँग्रेस आगामी मनपा निवडणुकीत राबविणार एक परिवार, एक तिकीट धाेरण : नाना पटोले

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला मारहाण

प्रत्यक्ष कार्यक्रम सुरु झाला तेव्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिरात आधीच बसले होते. त्यानंतर स्मृती इराणी बोलायला उठल्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्हीबाजूंनी तुफान घोषणाबाजी झाल्याने गोंधळ निर्माण झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांच्यावर भाजपच्या एका कार्यकर्त्यांने हातही उगारला. यानंतर पोलिसांनी सर्वांना आवरण्याचा प्रयत्न केला. पण या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात तेंदूपत्ता तोडायला गेलेला मजूर ठार

Back to top button