बारामती : इन्स्टाग्रामवर झाली ओळख; लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार | पुढारी

बारामती : इन्स्टाग्रामवर झाली ओळख; लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

बारामती; पुढारी वृत्तसेवा : तरुणीशी इन्स्ट्राग्रामवर ओळख झाल्यानंतर पुढे तिच्याशी जवळीक साधत बलात्कार केल्याचा प्रकार बारामतीत घडला. या प्रकरणी अविनाश गुलाब मासाळ (वय २२, रा. झारगडवाडी, ता. बारामती) याच्याविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित तरुणी २० वर्षीय आहे. तिची मासाळ याच्याशी इन्स्टाग्रामवर नऊ महिन्यांपूर्वी ओळख झाली होती.  ते एकमेकांशी चॅट करू लागले. त्यानंतर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. तिला विवाहाचे अमिष दाखवत अविनाश मासाळ याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने लग्नाचा विषय काढल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरु केली.  त्याने तिला धमकी देत विवाह करण्यास नकार दिला. तरुणीने त्याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यानुसार मासाळ याच्‍यावर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मुकुंद पालवे तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ?

Back to top button